Headlines

भारताने गुपचूप गेम केला, कुणालाही कळू न देता… युद्ध सुरू असतानाच पाकिस्तानची झोप उडाली!

भारताने गुपचूप गेम केला, कुणालाही कळू न देता… युद्ध सुरू असतानाच पाकिस्तानची झोप उडाली!
भारताने गुपचूप गेम केला, कुणालाही कळू न देता… युद्ध सुरू असतानाच पाकिस्तानची झोप उडाली!


संपूर्ण जगाचे लक्ष मध्य पूर्वेकडे लागलेले आहे. अमेरिका आणि इस्रायल इराणवर भीषण हल्ले करत आहेत. इराणकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणकडूनही आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला जात आहे. भारताने हे युद्ध थांबण्याचे आवाहन केले आहे आणि चर्चेतून मार्ग काढावा असा सल्ला दिला आहे. या युद्धाच्या काळात भारताने आपले हवाई क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. ज्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताने एका शस्त्र खरेदीला मान्यता दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गेल्या वर्षी मे मध्ये भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या हल्लांना नष्ट करण्यासाठी वापरलेल्या क्षेपणास्त्रांबाबत भारतीय हवाई दलाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता आणखी काही S-400 हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. अहवालानुसार संरक्षण खरेदी मंडळाने भारतीय हवाई दलासाठी रशियाकडून आणखी पाच S-400 हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. संपूर्ण जगात युद्धाचा भडका उडाला आहे. अशावेळी भारताने हा निर्णय घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

S-400 खरेदीला मंजुरी

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण मंडळाने भारतीय हवाई दलाच्या S-400 हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता हा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेकडे (DAC) पाठवला जाणार आहे. त्यानंतर खरेदीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भारताकडे सध्या तीन S-400 हवाई संरक्षण प्रणाली आहेत, ज्याचा वापर ऑपरेशन सिंदूरमध्ये करण्यात आला होता. आता आणखी 5 S-400 हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केल्या जाणार आहे.

पाकिस्तानची झोप उडवणारी बातमी

ऑपरेशन सिंदूर दरम्यान रशियन बनावटीच्या S-400 ने जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तानकडून येणारी क्षेपणास्त्रे त्यांनी नष्ट केली होती. यामुळे मुनीर आणि शाहबाज शरीफ यांचे हल्ले नाकाम झाले होते. आता रशियाकडून आणखी पाच एस-400 प्रणाली खरेदी केल्या जाणार आहेत. त्यामुळे आगामी काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाल्यास याचा फायदा भारतीय सैन्याला होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *