
अमेरिका-इस्रायलचं इराण विरुद्ध युद्ध सुरु आहे. युद्धात इराण एकाचवेळी अनेक देशांसोबत लढतोय. 28 फेब्रुवारी 2026 ला अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने सुरुवातीला अनेक आखाती देशांवर हल्ले केले होते. आता इराणने आखाती देशांवरील हल्ले कमी केले आहेत. इराणने आपली चाल बदलली आहे. काही एक्सपर्ट्सनुसार अमेरिका-इस्रायलसमोर इराणी मिसाइल निष्प्रभ झाली आहेत. कारण इराणी लॉन्च पॅड उद्धवस्त झालेत. काही एक्सपर्ट्सच्या मते इराणला आखातामधील मुस्लिम देशांसोबत आपले संबंध सुधारायचे आहेत. तसचं काही एक्सपर्ट्सच म्हणणं असं आहे की, युद्ध दीर्घकाळ चालणार असेल तर ते शस्त्रास्त्र राखून ठेवतायत. शस्त्रांद्वारे वार-पलटवारशिवाय इराणने नरेटिवची लढाई सुद्धा वेगवान केली आहे. इराणी नेते वारंवार आखाती देशांना सांगतायत की, आम्ही तुमच्याविरोधात नाहीय. राष्ट्रपती ट्रम्प तुम्हाला युद्धामध्ये ढकलतायत असं इराणी नेते अमेरिकी जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
एक्सपर्टनुसार इराणच्या सततच्या हल्ल्यांमुळे त्यांच्या ताफ्यातील बॅलेस्टिक मिसाईल्सची संख्या कमी झाली आहे. एक्सपर्टनुसार इराणकडे आता काही दिवसांची फायरपावर उरली आहे. युद्ध दिर्घकाळ लढण्यासाठी इराण मुद्दामूनही हे सांगत असेल. शेकडो बॅलेस्टिक मिसाइल आणि त्यांच्या ड्रोन्सना टार्गेट केल्यानंतर मिडिल ईस्टमध्ये यूएस आणि त्यांच्या मित्रांना टार्गेट करण्याची इराणची क्षमता कमी होतेय असं अमेरिकी सेंट्रल कमांडचे अधिकारी ब्रॅड कूपर यांनी सांगितलं. युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. इराणची मिसाइल लॉन्च करण्याची क्षमता 86 टक्क्याने घटली आहे, असं सेंटर कॉमचं म्हणणं आहे. चार दिवसात इराणचे मिसाइल लॉन्च 86 टक्के आणि ड्रोन लॉन्च 76 टक्क्यांनी कमी झालं आहे. सेंटर कॉमनुसार, अमेरिकी सैन्याने 20 पेक्षा जास्त इराणी जहाजं बुडवली आहेत.
इराणची रणनिती काय?
अमेरिका आणि इस्रायलने लॉन्च साइट्स आणि मिसाइल निर्मितीच्या कारखान्यांना अचूक टार्गेट केल्यामुळे इराणची बॅलेस्टिक मिसाइल हल्ल्याची क्षमता पूर्णपणे कमी झाली आहे. इराण ड्रोन्स सारख्या स्वस्त पर्यायाचा हल्ल्यासाठी वापर करत आहे. बॅलेस्टिक मिसाईल्सचा कमी आणि योग्य ठिकाणी वापर करण्याची त्यांची रणनिती असू शकते. बॅलेस्टिक मिसाइल्स इराणच्या ताफ्यातील सर्वात घातक शस्त्र आहे. इस्रायलमध्ये इराण अजूनही हल्ले करत आहे. पण आखाती देशातील त्यांचे हल्ले कमी झाले आहेत.