
Anil Kapoor Daughter: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांची मोठी लेक आणि अभिनेत्री सोनम कपूर हिच्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या छोट्या मुलीबद्दल फार कोणाला माहिती नाही. अनिल कपूर यांच्या छोट्या मुलीचं नाव रिया कपूर असं आहे. रिया अभिनयापासून दूर असते, पण आज रिया कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. रिया कोट्यवधींची कमाई करते… रिया कपूर अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
रिया कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, रिया हिने मुंबई येथील धीरुबाई अंबानी शाळातून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर तिने न्यू यॉर्क विद्यापीठातून नाट्य साहित्यात पदवी प्राप्त केली. पदवी प्राप्त केल्यानंतर, रियाने करिअर करण्याचा निर्णय घेतला. अभिनय करण्याऐवजी, तिने निर्माती म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
रिया हिने 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आयेशा’ सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमात अभिनेत्री सोनम कपूर हिने मुख्य भूमिका बजावलेली होती. त्यानंतर रिया हिने ‘खुबसूरत’, ‘वीरे दी वेडिंग’ दी, ‘थैंक यू फॉर कॉलिंग’ आणि ‘क्रू’ यांसारख्या सिनेमांची निर्मिती केली… रिया निर्मिती क्षेत्रात तर सक्रिय आहेच, पण ती फॅशन डिझायनर देखील आहे. तिचं स्वतःचं क्लोदिंग ब्रँड देखील आहे… Rheson असं तिच्या ब्रँडचं नाव आहे. सोनम आणि रिया यांनी मिळून क्लोदिंग ब्रँड सुरु केला आहे.
रिया तिच्या सिनेमांमधून आणि व्यवसायातून कोट्यवधींची कमाई करते. मीडिया रिपोर्टनुसार, रिया हिची नेटवर्थ 52 कोटी रुपये आहे. रिया अत्यंत रॉयल आयुष्य जगते… सोशल मीडियावर देखील रिया कायम सक्रिय असते…
रिया हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, रिया हिने 2021 मध्ये मुंबई येथे करण भुलानी याच्यासोबत लग्न केलं. मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्ष करण याला डेट केल्यानंतर रिया हिने लग्न केलं. आज रिया तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात आनंदी आहे.