Headlines

तर उत्तर कोरिया थेट अमेरिका आणि इराणच्या युद्धात उतरणार, किंग जोंग उन याची खळबळजनक धमकी, थेट…

तर उत्तर कोरिया थेट अमेरिका आणि इराणच्या युद्धात उतरणार, किंग जोंग उन याची खळबळजनक धमकी, थेट…
तर उत्तर कोरिया थेट अमेरिका आणि इराणच्या युद्धात उतरणार, किंग जोंग उन याची खळबळजनक धमकी, थेट…


इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही या हल्ल्यांना जोरदार उत्तर दिले जात आहे. 13 अमेरिकेच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. ज्या ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्या ठिकाणी हल्ला अमेरिकेकडून करण्यात आला. अमेरिकेकडून इराणच्या जहाजांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. भारतातून इराणीच्या दिशेने निघालेल्या इराणी युद्धनाैकेवर मोठा हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये 87 इराणी सैनिकांचा जीव गेला. अमेरिका इराण युद्धामुळे जग संकटात आहे. इराणकडून कतार, कुवेत आणि साैदी अरेबियाच्या तेलाच्या प्रकल्पांवर हल्ला करण्यात आला. हेच नाही तर इराणने महत्वाचा सागरीमार्ग बंद केल्याने एलपीजी गॅसचा पुरवठा देखील थांबला. ज्यामुळे अनेक देश संकटात आले आणि त्यापैकी एक भारत देखील आहे.

भारतामध्येही एलपीजी गॅसची समस्या आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे मार्ग काढला जात आहे. अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या युद्धात अनेक देशांचे नागरिक अडकले आहेत. दुबईमध्ये मोठे हल्ले होत असून भारतीय नागरिकांसोबतच इतर देशांचेही नागरिक युद्ध होत असलेल्या देशांमध्ये अडकले. यादरम्यान आता जगाचे टेन्शन वाढवारी धमकी देण्यात आली.

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर किम जोंग उन याने म्हटले की, जगात कुठेही एखाद्या कोरियन नागरिकाला इजा झाली तर उत्तर कोरिया गप्प बसणार नाही. जर आमच्या एकाही नागरिकाचे रक्त सांडले तर उत्तर कोरिया थेट युद्धात उतरेल आणि त्याची पूर्ण जबाबदारी फक्त आणि फक्त अमेरिकेवर असेल.

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर थेट किंग जोंग उनने मोठा इशारा दिला. किंग जोंग उनचा निशाणा थेट अमेरिकेवर होता. यासोबतच त्यांनी युद्धाच्या मैदानात उतरण्याची धमकीही दिली आहे. जर भविष्यात काही घडले तर उत्तर कोरिया थेट युद्धाच्या मैदानात उतरू शकतो. उत्तर कोरियाच्या या धमकीने जग तणावात आले आहे. या युद्धाची झळ अनेक देशांना बसल्याचे बघायला मिळत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *