Headlines

PM Kisan Yojana : अखेर ठरलं! या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये; मोठी अपडेट समोर

PM Kisan Yojana : अखेर ठरलं! या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये; मोठी अपडेट समोर
PM Kisan Yojana : अखेर ठरलं! या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये; मोठी अपडेट समोर


PM Kisan Samman Yojana 22 Installment : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यावेळी आता शेतकऱ्यांना 22 वा हप्ता मिळणार आहे. एकूण तीन टप्प्यांत शेतकऱ्यांना हे पैसे मिळतात. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी ही मदत मिळण्याच वाट पाहात आहेत. परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आलेले नाहीत. असे असतानाच आता मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना लवकरच हे पैसे मिळणार आहेत.

नेमकी का यमाहिती समोर आली?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेकऱ्यांना आता 22 वा हप्ता मिळणार आहे. 22 व्या हप्त्याअंतर्गत अगोदर ही मदत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानंतर होळीच्या अगोदर ही मदत मिळेल असे सांगितले जात होते. परंतु आता फेब्रुवारी महिना तसेच होळी संपलेली आहे. तरीही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. आता मात्र ही मदत नेमकी कधी मिळणार, याबाबत माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांना 22 वा हप्ता नेमका कधी मिळणार?

मीडिया रिपोर्टनुसार आता पीएम शेतकरी सन्मान योजनेचा 22 वा हप्ता शेतकऱ्यांना 13 मार्च रोजी मिळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर असणार आहेत. याच दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी शेतकरी सन्मान योजनेच्या 22 व्या हप्त्याची घोषणा करण्याची शक्यता होती. परंतु या घोषणेबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही?

दरम्यान, या योजनेचा काही शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली नाही तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तयार केलेला नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. कुटंबात एकापेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळत असेल तर अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्याच्या घरात एखादी व्यक्ती शासकी यनोकरीला असेल तर त्या शेतकऱ्यालाही 22 वा हप्ता मिळणार नाही. एखाद्या शेतकऱ्याला 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *