Headlines

इंटीमेट सीनची शूटिंग पडली महागात; बाथटबमध्ये 6 तास घालवल्यानंतर अभिनेत्रीची तब्येत बिघडली

इंटीमेट सीनची शूटिंग पडली महागात; बाथटबमध्ये 6 तास घालवल्यानंतर अभिनेत्रीची तब्येत बिघडली
इंटीमेट सीनची शूटिंग पडली महागात; बाथटबमध्ये 6 तास घालवल्यानंतर अभिनेत्रीची तब्येत बिघडली


‘ब्रिजेटन’ या लोकप्रिय मालिकेचा चौथा सीझन सध्या मोठ्या चर्चेत आहे. या सीझनचा दुसरा भाग 26 फेब्रुवारी रोजी Netflix वर स्ट्रीम झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सीझनमध्ये ब्रिजर्टन कुटुंबातील दुसरा मुलगा बेनेडिक्ट ब्रिजर्टन आणि सोफी बेक यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. या कथेला आतापर्यंतच्या मालिकेतील सर्वात सुंदर आणि वास्तववादी प्रेमकथा असेही म्हटले जात आहे.

या मालिकेत सोफी बेकची भूमिका येरिन हाने साकारली आहे तर बेनेडिक्ट ब्रिजर्टनच्या भूमिकेत ल्यूक थॉम्पसन दिसत आहे. या दोन्ही कलाकारांच्या अभिनयासोबतच त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीचीही प्रेक्षकांकडून मोठी चर्चा होत आहे. मालिकेत दोघांमधील काही इंटिमेट सीन देखील दाखवण्यात आले आहेत. त्यापैकी एक बाथटब सीन सध्या विशेष चर्चेत आहे.

बाथटब सीनच्या शूटिंगनंतर आरोग्याची समस्या

एका मुलाखतीत येरिन हाने या सीनच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. तिने सांगितले की या सीनसाठी तिने शरीरावर बेबी पावडर लावली होती, जेणेकरून त्वचा कोरडी राहील आणि इंटिमेट सीन करण्यास सोपा जाईल.

मात्र बाथटब सीनच्या शूटिंगनंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या त्वचेवर लाल पुरळ आणि खाज येऊ लागली. तपासणी केल्यानंतर तिला फॉलिक्युलायटिस ही त्वचेची समस्या झाल्याचे समोर आले. त्यामुळे तिला स्टेरॉइड क्रीम वापरावी लागली.

सहा तास सुरु होती शूटिंग

ल्यूक थॉम्पसनने सांगितले की या सीनचे शूटिंग जवळपास सहा तास चालले होते. त्या दरम्यान बाथटबमधील पाण्यात काही पदार्थ मिसळले गेले होते. ज्यामुळे पाणी दुधासारखे दिसत होते. येरिनने सांगितले की दुसऱ्या दिवशी ल्यूकला काहीच त्रास झाला नाही. मात्र त्याला त्वचेची प्रतिक्रिया जाणवली. ती हसत म्हणाली, ‘मी थोडी संवेदनशील आहे.’

काय आहे फॉलिक्युलायटिस?

फॉलिक्युलायटिस ही त्वचेची सामान्य समस्या आहे. यात केसांच्या मुळांभोवती सूज येते आणि लहान पिंपलसारखे पुरळ दिसू लागतात. हे प्रामुख्याने बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होते. हलका त्रास असल्यास काही दिवसांत तो आपोआप बरा होऊ शकतो. मात्र गंभीर प्रकरणांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. कधी कधी या स्थितीला ‘हॉट टब रॅश’ असेही म्हटले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *