Headlines

Iran Israel War : आणखी एक देश हादरला, अमेरिकेने थेट…धक्कादायक माहिती समोर येताच खळबळ!

Iran Israel War : आणखी एक देश हादरला, अमेरिकेने थेट…धक्कादायक माहिती समोर येताच खळबळ!
Iran Israel War : आणखी एक देश हादरला, अमेरिकेने थेट…धक्कादायक माहिती समोर येताच खळबळ!


Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. या युद्धाचे परिणाम भारतावरही पडायला सुरुवात झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा दर वाढला आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडून इराणवर जोरदार हल्ले केले जात आहेत. या दोन्ही देशांनी आतापर्यंत इराणचे अनेक लढाऊ जहाज, नौकांवर हल्ले केले आहेत. या सर्व हल्ल्यांमध्ये अमेरिकेने इराणच्या ‘आयरीस देना’ या युद्धनौकेवर केलेला हल्ला सर्वाधिक चर्चेचा ठरला. भारताताच्या विशाखापट्टणम येथे युद्ध कवायतीसाठी आलेल्या या जहाजाला अमेरिकेने हल्ला केल्यामुळे जलसमाधी मिळाली. या हल्ल्यात बचावलेल्या खलाशांवर श्रीलंकेत उपचार केले जात आहेत. असे असतानाच आता मोठी माहिती समोर येत आहे. अमेरिका आता श्रीलंकेवरही दबाव टाकत असल्याचा दावा केला जातोय. याबाबत आता खुद्द श्रीलंकेनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

श्रीलंकेवर टाकला जातोय का दबाव?

आयरीस देना या युद्धनौकेवर अमेरिकेकडून हल्ला झाल्यानंतर या नौकेतील 87 जणांचा मृत्यू झाला. तर 32 जण बचावले आहेत. या 32 जणांवर सध्या आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत श्रीलंकेत उपचार सुरू आहेत. असे असतानाच आता अमेरिककडून श्रीलंकेवर दबाव टाकला जात आहे, असे सांगितले जात आहे. ज्या खलाशांवर सध्या उपचार सुरू आहेत, त्यांना परत इराणमध्ये पाठवू नये, असे अमेरिका श्रीलंकेला सांगत असल्याचा दावा केला जातोय. आता याच दाव्यावर श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री विजिथा हिराथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खरंच श्रीलंकेवर दबाव टाकला जातोय?

विजिथा हिराथ हे सध्या नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. याबाबत विचारले असता त्यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर दिले नाही. परंतु आम्ही इराणच्या 32 खलाशांवर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार उपचार करत आहोत, असे सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे आम्ही पालन करत आहोत, असेही ते म्हणाले. दरम्यान, श्रीलंकेने इराणच्या आणखी एका युद्धनौकेला आश्रय दिला आहे. या जहाजाचे नाव आयरीस बुशेहर असे आहे. भारतानेही आयरीस लावान या इराणच्या तिसऱ्या जाहाजाला आश्रय दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *