Headlines

Success Story : सांगलीच्या खेड्यातला पोरगा थेट IPS, मजुरी करणाऱ्या आईला दिलं सर्वात मोठं गिफ्ट; राज्यभरात चर्चा!

Success Story : सांगलीच्या खेड्यातला पोरगा थेट IPS, मजुरी करणाऱ्या आईला दिलं सर्वात मोठं गिफ्ट; राज्यभरात चर्चा!
Success Story : सांगलीच्या खेड्यातला पोरगा थेट IPS, मजुरी करणाऱ्या आईला दिलं सर्वात मोठं गिफ्ट; राज्यभरात चर्चा!


केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सिव्हिल सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या प्रतिष्ठित परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या पाठोपाठ राजेश्वरी सुवे एम यांनी दुसरा, तर आकांक्षा धूल यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे. या वर्षी एकूण 958 विद्यार्थी पास झाले आहेत. यात महाराष्ट्रातील एका तरुणाने देखील यश मिळवले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सांगलीच्या प्रवीणची गगन भरारी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील मिटकी येथील प्रवीण कोळपे, हा देशात 584 व क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाला आहे. प्रवीण कोळपे यांनी मोठ्या जिद्दीने सहाव्या प्रयत्नात युपीएससीचे शिखर सर केले आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने शेतात मोलमजुरी करून प्रवीणचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं,यामुळे प्रवीण याने हे यश मिळवत आपल्या आई-वडिलांने पाहिलेले अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केला आहे.

नातेवाईक आनंदी

या यशानंतर प्रवीण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून नातेवाईक ग्रामस्थांकडून प्रवीण याचा सत्कार देखील करण्यात आला आहे. प्रवीणची आई आणि आजी कडून देखील प्रविणचे भरभरून कौतुक करण्यात येत असून नातू अधिकारी झाल्याने आता लाल दिव्याच्या गाडीतून मला फिरायचं आहे, अशी आनंद भावना प्रवीणच्या आजीने यावेळी व्यक्त केली. अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून अधिकारी बनलेल्या प्रवीणच्या यशाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आदर्श

प्रवीण कोळपे यांचे यामुळे खास आहे की, युपीएससी ही जगातील सर्वात अवघड परीक्षेपैकी एक परीक्षा आहे. ही परीक्षा पास होण्यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्याची आवश्यकता असते. प्रवीण यांनी आपल्या परिस्थीतीची जाण ठेवत यश मिळवले आहे हे कौतुकास्पद आहे. प्रवीण यांचे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, खासकरून अशा विद्यार्थांसाठी जे गावाखेड्यात शिक्षण घेतात आणि अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. या यशानंतर प्रवीण यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अनेकांनी घरी जाऊन प्रवीणचे अभिनंदन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *