Headlines

टी-20 फायनलची चर्चा सुरू असतानाच या खेळाडूचा धक्कादायक निर्णय, सामना संपताच निवृत्ती; टीम झाली भावूक!

टी-20 फायनलची चर्चा सुरू असतानाच या खेळाडूचा धक्कादायक निर्णय, सामना संपताच निवृत्ती; टीम झाली भावूक!
टी-20 फायनलची चर्चा सुरू असतानाच या खेळाडूचा धक्कादायक निर्णय, सामना संपताच निवृत्ती; टीम झाली भावूक!


alyssa healy Retirement : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्याला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. कोट्यवधी भारतीय आज हा सामना पाहणार आहेत. दरम्यान एकीकडे या अंतिम सामन्याची सगळीकडे चर्चा चालू असतानाच एका दिग्गज कर्णधाराने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या क्रिकेटरची आता सगळीकडेच चर्चा होत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने घेतली निवृत्ती

पर्थच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोशिएशन ग्राऊंडवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघामध्ये कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर तब्बल 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने एवढा मोठा विजय मिळवलेला असला तरीही हा सामना मात्र ऑस्ट्रेलियाची संघाची कर्णधार एलिसा हिली हिची सगळीकडे चर्चा होत आहे. एलिसा हिलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतासोबत सामना होण्यापूर्वीच तिने निवृत्तीची घोषणा केली होती. भारतासोबतचा तिचा हा शेवटचा कसोटी सामना होता.

भारताला केलं पराभूत

हिलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील टी-20 सामन्यांमध्ये भाग घेतला नव्हता. या दोन्ही संघात झालेल्या कसोटी सामन्यात मात्र तिने सहभागी होऊन संघाला जिंकून दाखवले. कसोटी सामन्यात जिंकण्याआधी ऑस्ट्रेलियाने भारताला एकदिवसीय सामन्यांत 3-0 ने पराभूत केले होते. एलिसा हिली हिला निरोप देताना तिच्या सहकारी खेळाडू भारच भावनिक झाल्याच्या दिसल्या.

10 गडी राखून लक्ष्य केलं पूर्ण

एलिसा हिली हिचा हा शेवटचा कसोटी सामना असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या इतर खेळाडूंनी तिला खांद्यावर उचलून घेतले. तसेच तिला संपूर्ण मैदानात फिरवण्यात आले. यावेळी काही खेळाडूंच्या डोळ्यात अश्रूदेखील तरळले. दुसरीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याच्या दिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताला 10 गडी राखून पराभूत केले. भारताचा दुसरा डाव 149 धावांवरच आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या 25 धावा हव्या होत्या. कोणतीही अडचण न येऊ देता ऑस्ट्रेलियन संघाने 10 गडी राखून हे लक्ष्य गाठले.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *