Headlines

6 आखाती देशातील US रडार यंत्रणा इराणने केली नष्ट, मिसाईलचा शोध घेणे अवघड, अमेरिकन वृत्तपत्राचा दावा

6 आखाती देशातील US रडार यंत्रणा इराणने केली नष्ट, मिसाईलचा शोध घेणे अवघड,  अमेरिकन वृत्तपत्राचा दावा
6 आखाती देशातील US रडार यंत्रणा इराणने केली नष्ट, मिसाईलचा शोध घेणे अवघड,  अमेरिकन वृत्तपत्राचा दावा


मध्य पूर्वेतील संघर्षात इराणचे प्रचंड नुकसान झाले आहे. इराणने अरब राष्ट्रात सौदी अरब आणि युएईसह मध्य पूर्वेतील सहा देशातील अमेरिकन सैन्य तळांवरील रडार सिस्टीमला नष्ट केले आहे. हा दावा अमेरिकेचे वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जनरलने केले आहे. बातमीत म्हटले आहे की सौदी अरब, कतार, संयुक्त अरब अमिरात ( युएई), जॉर्डन, कुवैत आणि बहारीन स्थित अमेरिकेन सैन्य रडार प्रणाली आणि मिसाईल डिटेक्शन केंद्रांवर हल्ले केले गेले. या हल्ल्यामुळे आखातातील अमेरिकन सुरक्षा कवचाला मोठा छेद पडला आहे.त्यामुळे अमेरिकेने युद्धात आघाडी घेतल्याच्या ट्रम्प यांचा दावा पोकळ असल्याचे दिसत आहे.

इराणी मिसाईलचा माग काढणे कठीण

इराणच्या या कारवाईला अमेरिका आणि इस्राईलच्या अलिकडच्या हल्ल्यांना विचारपूर्वक दिलेले प्रत्युत्तर मानले जात आहे. त्यामुळे संपूर्ण आखाताला या युद्धाची मोठी झळ बसल्याचे म्हटले जात आहे. आता इराणच्या मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याच्या स्थितीत त्यांना डिटेक्ट करुन जबाबी हल्ला करणे अमेरिकेसाठी सोपे असणार नाही.

ते एक पराभूत व्यक्तीमत्व – डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प यांनी सुरु केलेल्या संघर्षात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसंदर्भातही चिंता वाढली आहे. इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी खुले आव्हान देत सांगितले की ट्रम्पना अमेरिका- इस्राईली हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल. या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सी अलर्टवर आहेत. मात्र, ट्रम्प यांनी या धमक्यांना फेटाळून लावले आहे. सीबीएस न्यूजशी बोलताना ट्रम्प यांनी इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्या वक्तव्याला फेटाळून लावत ते एक पराभूत व्यक्तीमत्व आहेत असे म्हटले आहे. मात्र इराणद्वारे अशा प्रकारे अरब देशातील अमेरिकन तळांना लक्ष्य केल्याने आता ट्रम्प यांची पुढील कार्यकाळ धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.

इराणचा ‘रडार गेम’

इराणने ६ आखाती देशातील अमेरिकेच्या रडार सिस्टीमला टार्गेट केल्याने एक प्रकारे सर्जिकल स्ट्राईक करुन अमेरिकेच्या अर्ली वॉर्निंग सिस्टीमला पंगू केल्याचे म्हटले जात आहे. या रडार सिस्टीमला संपवणे म्हणजे अमेरिकेची आणि त्यांच्या सहकारी देशांची मिसाईल आणि ड्रोन ट्रॅक करण्याची क्षमता कमी झाल्याचे द्योतक आहे. यामुळे इराणचे भविष्यातील हल्ले घातक असतील असे म्हटले जात आहे. इराणवर २८ फेब्रुवारी रोजी हल्ला केल्यानंतर नऊ दिवस झाले तरी इराण बॅकफुटला जाण्याऐवजी हल्ल्याची रणनिती बदलत आहे.

· टार्गेटवर 6 देश: सौदी अरब, कतार, यूएई, जॉर्डन, कुवैत आणि बहारीनच्या अमेरिकन तळांना टार्गेट

· WSJ ची बातमी : वॉल स्ट्रीट जर्नलने दुजारो दिला आहे की रडार आणि मिसाईल डिटेक्शन सिस्टमला मोठे नुकसान झाले आहे.

· लारीजानीची धमकी: इराणी सुरक्षा प्रमुख लारीजानी यांनी ट्रम्प यांना थेट परिणाम भोगण्यास तयार राहा अशी धमकी दिली आहे.

· ट्रम्प यांचा पलटवार: ट्रम्प यांनी लारीजानी यांना पराभूत म्हटले आहे. इराणने भीतीमुळे आखाती देशांसमोर शरणागती पत्करली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *