पुरुषांना बनियान न घालण्याची मोकळीक पण स्त्रियांना ब्रा न घालण्याची मुभा नाही..; महिला दिनानिमित्त अभिनेत्याची ती पोस्ट चर्चेत

पुरुषांना बनियान न घालण्याची मोकळीक पण स्त्रियांना ब्रा न घालण्याची मुभा नाही..; महिला दिनानिमित्त अभिनेत्याची ती पोस्ट चर्चेत
पुरुषांना बनियान न घालण्याची मोकळीक पण स्त्रियांना ब्रा न घालण्याची मुभा नाही..; महिला दिनानिमित्त अभिनेत्याची ती पोस्ट चर्चेत


8 मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा केला जातो. जागतिक महिला दिनानिमित्त जगभरात महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतो. परंतु आजही महिलांच्या बाबतीत काही परिस्थिती बदललेल्या नाहीत, ही भावना अनेकांच्या मनात कायम आहे. अभिनेता गौरव मालणकरने त्याच्या एका पोस्टद्वारे या भावनेला वाट मोकळी करून दिली आहे. महिला दिन तर साजरा होतो, पण आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर महिलांना काही गोष्टी आजही सहन कराव्या लागत असल्याचं मत त्याने यातून व्यक्त केलं आहे. गौरवची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

गौरव मालणकरची पोस्ट-

‘आम्हाला मासिक पाळीच्या वेदना कळणार नाहीत कधीच, आम्हाला लेबर पेन कळणार नाही कधीच, आम्हाला दिवस दिवस साडी नेसून, केसांना असंख्य पिना टोचून शूटिंगला उभं राहण्याचं दु:ख कळणार नाही कधीच. आमच्याकडे बनियान न घालण्याची मोकळीक आहे पण तुम्हाला ब्रा न घालण्याची मुभा नाही कधीच (भले ब्रेस्ट कॅन्सरचा आकडा कितीही वाढो आम्हाला काय त्याचं), सबंध कपडे परिधान करून सुद्धा रस्त्यावरून चालताना तुमच्या अवयवांकडे निरखून बघणाऱ्या नजरा पचवण्याची ताकद आमच्यात येणार नाही कधीच,’ असं त्याने लिहिलंय.

या पोस्टमध्ये गौरवने पुढे म्हटलंय, ‘वर्किंग वुमन असलीस तरी सो कॉल्ड संस्कारी राहण्याची पुरुषांनी थोपवलेली जबाबदारी आम्हाला पार पडता येणार नाही कधीच. मी माझ्या बायको, प्रेयसीला पूर्ण स्वातंत्र्य देतो रे, ह्यात सुद्धा एक मेल इगो आहे हे आम्हाला कळणार नाही कधीच. असो जग कितीही काळाच्या पुढे जात असलं तरी तुमच्या वाट्याला येणारी संकटं काही अंशी तशीच राहणार आहेत दुर्दैवाने.. जग पुरुषप्रधान संस्कृतीतून लवकरात लवकर बाहेर पडो, ह्या तुम्हाला महिलादिनी शुभेच्छा.. तुम्ही फायटर आहात.’

गौरवच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. ‘किमान तू या गोष्टी नोटीस तरी केल्यास’, असं कलाकार साक्षी गांधीने म्हटलंय. तर ‘अगदी खरंय.. या गोष्टी खूप कमी माणसांना समजतात’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *