एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी…; फडणवीसांची खोचक टीका

एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी…; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी…; फडणवीसांची खोचक टीका


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या टीकेला हास्यास्पद संबोधले आहे. खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रम्प यांचे गुलाम म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ज्यांची संपूर्ण हयात एका परिवाराची गुलामगिरी करण्यात गेली, त्यांना देश कसा चालवावा किंवा देशाला सार्वभौम कसे ठेवावे याची कल्पना असणे अपेक्षित नाही.

फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केले की, जेव्हा टेरिफ वॉरसारखी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा भारताने कणखरपणे भूमिका घेतली. भारत कोणत्याही दबावाखाली झुकला नाही. उलट, भारताने विविध देशांसोबत टेरिफ करारांवर स्वाक्षरी करून आपली ताकद दाखवून दिली. या धोरणामुळे टेरिफ वॉर सुरु करणाऱ्यांनाही माघार घ्यावी लागली. अशाप्रकारे, आपल्या देशाची स्वायत्तता आणि आर्थिक सार्वभौमत्व कसे जपले जाते, हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने जगाला दाखवून दिले आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी अशा प्रकारची टीका करणे हे निव्वळ हास्यास्पद आहे, असे फडणवीस म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *