Headlines

US-Israel-Iran War Impact | पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर… युद्धामुळे महागाई वाढली, सुक्यामेव्याचे भाव गगनाला

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता मुंबईतील बाजारपेठांवरही दिसू लागला आहे. विशेषतः मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये आयात होणाऱ्या सुका मेवा आणि इतर विदेशी वस्तूंवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या मालाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे इराणी पिस्ता, पाईन नट्स, खजूर यांसारख्या सुका मेव्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या अनेक विदेशी वस्तूंवरही या परिस्थितीचा परिणाम जाणवत आहे. मालाची उपलब्धता कमी झाल्यामुळे काही वस्तूंचे दर वाढले असून व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही याचा फटका बसत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, आखाती देशांतील परिस्थिती स्थिर होईपर्यंत आयातीत मालाच्या किमतींमध्ये चढ-उतार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही काळ सुका मेवा आणि इतर विदेशी वस्तू महाग राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *