
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील लग्नसराई हॉल व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. आगामी लग्न सोहळ्यांसाठी झालेल्या बुकिंग रद्द करण्याचा विचार अनेक लॉन्स व्यावसायिक करत आहेत. व्यवसायिकांनी सांगितले की, जास्त गॅस लागणाऱ्या पदार्थांसाठी जेवणावळीमध्ये वेगळ्या नियमनाखाली पदार्थ तयार करण्यात येणार आहेत. पुण्यात शाही विवाह सोहळे पार पडतात, मात्र इंधनाच्या तुटवड्यामुळे या सर्व विवाह सोहळ्यांवर देखील काही बंधने लॉन्स असोसिएशनकडून घालण्यात आली आहेत. यामुळे पुण्यातील लग्नसोहळ्यांवर गॅस तुटवडा थेट परिणाम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे, तसेच व्यवसायिक आणि ग्राहक दोघांनाही यामुळे योजना बदलावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.