मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प खरोखर घाबरले? अमेरिकेच्या युद्धनौकांबाबतच्या इराणच्या दाव्याने खळबळ

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प खरोखर घाबरले? अमेरिकेच्या युद्धनौकांबाबतच्या इराणच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प खरोखर घाबरले? अमेरिकेच्या युद्धनौकांबाबतच्या इराणच्या दाव्याने खळबळ


मध्यपूर्वेत भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिकेने इराणचे सैन्य कमकुवत झाल्याचा दावा केला आहे. मात्र आता इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने अमेरिकन युद्धनौकांबाबत मोठा दावा केला आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर अलिरेझा फदवी यांनी म्हटले की, सध्या कोणतीही अमेरिकन युद्धनौका इराणपासून 700 किलोमीटरच्या आत येण्याची हिंमत करत नाही. याचाच अर्थ अमेरिकन नेव्हीने माघार घेतल्याचा दावा इराणने केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेला आमच्या योजनेची माहिती

अलिरेझा फदवी यांनी म्हटले की, ‘अमेरिकन नौदल इराणपासून दूर गेले आहे, कारण त्यांना माहीत आहे की इराणकडे अमेरिकन विमानवाहू युद्धनौका (एअरक्राफ्ट कॅरिअर) बुडवण्यासाठी विशेष लष्करी योजना आहे. इराणची मिसाइल आणि ड्रोन क्षमता इतकी मजबूत आहे की अमेरिकन जहाजे सुरक्षित अंतर राखूनच हालचाल करत आहेत.’ इराणच्या या दाव्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धातून माघार तर घेतली नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

होर्मुज सामुद्रधुनीत तणाव वाढला

इराणच्या सैन्याने असेही म्हटले आहे की, जर अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांचे हल्ले सुरूच राहिले, तर होर्मुज सामुद्रधुनी परिसरातील परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. कारण इराण यापूर्वीही चेतावणी देत आला आहे की तो या महत्त्वाच्या समुद्री मार्गातून होणारा तेल पुरवठा थांबवू शकतो. त्यामुळे आता इराणच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेने दावे फेटाळले

इराणने अमेरिकन युद्धनौका दूर गेल्याचा दावा केला आहे. मात्र अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी इराणचे अनेक दावे यापूर्वीही फेटाळले आहेत. अमेरिकेचे म्हणणे आहे की, आमची विमानवाहू युद्धनौका आणि नौदलाचा ताफा इराणच्या आसपासच्या भागात सक्रिय असून लष्करी कारवाई सुरू आहे. असं असलं तरी आता इराणने आक्रमक रूप धारण केले आहे. इराणने पर्शियन गल्फमध्ये व्यापारी जहाजांवर हल्ले केले आहे. तसेच दुबई विमानतळावरही हल्ला केला आहे. यात 4 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इराणने पश्चिम आशियातील बँका आणि आर्थिक संस्थांवरही हल्ला करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *