Headlines

इस्त्रायलने वाढवले जगाचे टेन्शन, नेतान्याहू यांचे खळबळजनक विधान, थेट म्हटले, सुन्नी आणि शिया जगाला…

इस्त्रायलने वाढवले जगाचे टेन्शन, नेतान्याहू यांचे खळबळजनक विधान, थेट म्हटले, सुन्नी आणि शिया जगाला…
इस्त्रायलने वाढवले जगाचे टेन्शन, नेतान्याहू यांचे खळबळजनक विधान, थेट म्हटले, सुन्नी आणि शिया जगाला…


इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. 28 फेब्रुवारी रोजी मोठा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर केला. या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. त्यानंतर इराणकडून सर्वाेच्च नेते म्हणून मोजतबा खामेनेई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र, अमेरिकेने केलेल्या 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यात आपल्या कुटुंबासोबत मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाल्याची माहिती आहे. हेच नाही तर मोजतबा खामेनेई यांच्या आरोग्याबाबत विविध दावे केले जात आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून मोजतबा खामेनेई थेट कॅमेऱ्यासमोर आलेच नाहीत. यादरम्यानच आता इस्त्रायलकडून मोठी धमकी देण्यात आली. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून मोठे हल्ले इराणच्या शहरावर करत आहे. इराणकडूनही इस्त्रायलच्या महत्वाच्या ठिकाणांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी केलेल्या विधानानंतर जगभरात खळबळ उडाली. बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले की, सुन्नी आणि शिया दोघेही अतिरेकी आहेत आणि त्यांच्यापासून संपूर्ण जगाला धोका निर्माण होत आहे. जोपर्यंत ही समस्या सुटणार नाही, तोपर्यंत आपण लढणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

बेंजामिन नेतान्याहू यांनी केलेल्या या विधानानंतर अनेकांनी थेट भुवया उंचावल्या आहेत. हिजबुल्लाहबाबत बोलताना नेतान्याहू यांनी म्हटले की, आम्ही लेबनीज सरकारला मोठा इशारा दिला आहे. कारण ते आगीसोबत खेळत आहेत. जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे.

नेतान्याहू पुढे बोलताना म्हणाले, मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की इराणी लोकांच्या प्रयत्नांशिवाय राजवट उलथवून टाकता येणार नाही. आम्ही त्यांना सांगितले आहे की मदत येत आहे. यावेळी नेतान्याहू मध्य पूर्वेतील परिस्थितीबद्दल बोलतानाही दिसले. मात्र, युद्ध नक्की कधी थांबणार यावर भाष्य करणे नेतान्याहू यांनी टाळल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, या युद्धामुळे जगातील अनेक देशांमध्ये कच्च्या तेलाचा आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *