इराणच्या या गोष्टीवर अमेरिकेची नजर, थेट खुलासा, कोणत्याही परिस्थितीमध्ये…

इराणच्या या गोष्टीवर अमेरिकेची नजर, थेट खुलासा, कोणत्याही परिस्थितीमध्ये…
इराणच्या या गोष्टीवर अमेरिकेची नजर, थेट खुलासा, कोणत्याही परिस्थितीमध्ये…


अमेरिका आणि इराण युद्धाचा सर्वात जास्त परिणाम होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल आणि वायू पुरवठ्यावर झाला आहे. हे युद्ध आता जमिनीहून थेट समुद्राकडे पोहोचले. इराणकडून या युद्धाच्या मुद्द्यात जगाची अडकवून केली जात आहे. इराणच्या या पावलामुळे अमेरिकेवरील दबाव प्रचंड वाढला आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेला नक्कीच कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध थांबवायचे आहे. मात्र, परिस्थिती अधिक किचकट होताना दिसत आहे. इराणनेही मोठा डाव खेळला असून त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, जर अमेरिकेला हे युद्ध थांबवायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या तीन अटी मान्य कराव्या लागतील. मुळात म्हणजे इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेची मोठी कोंडी झाल्याचे बघायला मिळतंय. इतके दिवस ज्या रशियावर आणि त्याच्या तेलावर निर्बंध घातले जात होते, त्याच रशियाच्या तेलावरील निर्बंध अमेरिका उठवत आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीबाबत अमेरिका काही मोठी भूमिका घेत नाहीये.

सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी अनेक गोष्टींवर थेट भाष्य केले. सर्जियो गोर यांनी म्हटले की, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प जगभरात सुरू असलेले संघर्ष संपवू इच्छितात. त्यामध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाचा देखील समावेश आहे. सर्जियो गोर यांनी म्हटले की, नुकताच झालेल्या हल्ल्यात भारतीय लोक ठार झाले. यामुळे परिस्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो.

भारत आणि अमेरिका एकत्र येऊन काम करत आहेत. कारण जागतिक बाजारपेठ स्थिर ठेवणे ही मुख्य भूमिका आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठ अस्थिर झाल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती हाताळण्यासाठी अमेरिका नक्की काय उपाय करत आहे, यावरही सर्जियो गोर यांनी भूमिका मांडली आहे.

होर्मुजच्या सामुद्रधुनी अमेरिकेच्या मोठ्या प्राधान्यांमध्ये आहे. सर्जियो गोर यांच्या मते, अमेरिकेने बाजारात पुरवठा राखण्यासाठी त्यांच्या धोरणात्मक तेल साठ्यातून तेल सोडले आहे. म्हणजे त्यांनी फक्त बाजारपेठ स्थिर राहावी, याकरिता रशियावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *