EPFO Interest: पीएफ खात्यावरील व्याज कधी मिळणारी, नवीन अपडेट जाणून घ्या

EPFO Interest: पीएफ खात्यावरील व्याज कधी मिळणारी, नवीन अपडेट जाणून घ्या
EPFO Interest: पीएफ खात्यावरील व्याज कधी मिळणारी, नवीन अपडेट जाणून घ्या


ईपीएफओ व्याजImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क

EPFO Interest Rate: ईपीएफने पीएफ खात्यावर 8.25 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. आता हे व्याज कधी जमा करण्यात येणार याविषयीची कोणतीही अपडेट सरकारने अथवा केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज(CBT) ने व्याजदर जाहीर केले आहे. आता पुढील प्रक्रिया लवकरच होईल. पण या प्रक्रियेसाठी साधारणतः तीन महिने लागू शकतात. पीएफवरील व्याज कधी जमा होणार आणि ती रक्कम कधी जमा होईल याविषयी कर्मचाऱ्यांची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

EPF च्या व्याजाची रक्कम खात्यात कधी येणार?

ईपीएफ व्याज हस्तांतरणासाठी सरकारने कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. पण खात्यात ही रक्कम येण्यापूर्वी पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

1.EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज वर्षभरासाठी ईपीएफ व्याजदर निश्चित करते.

2. CBT चा निर्णय केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येतो.

3.केंद्र सरकार या निर्णयावर अंतिम फैसला घेते. त्यानंतर व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यात जमा होईल.

4.आतापर्यंत पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सरकारची अंतिम मंजूरी येण्यासाठी कमीत कमी तीन महिने लागू शकतात.

EPF वरील व्याजदर कसं मोजलं जात?

EPF योजना 1952 चा नियम 60 नुसार, व्याज मोजण्यासाठी एका निश्चित पद्धतीचा वापर करण्यात येतो. त्यानुसार व्याजाची रक्कम केंद्र सरकार आणि सीबीटीनं निश्चित केल्यानंतर जमा करण्यात येते. मासिक चालू रक्कमे, शिल्लकी आधारे ईपीएफ व्याज काढलं जाते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवसापासून ते लागू होतं. व्याज मोजण्यासंबंधी काही नियम आहेत.

मागील वर्षाच्या शिल्लकी आधारे पूर्ण वर्षासाठी व्याज

या नियमानुसार, आर्थिक वर्षाच्या अखेरीस पीएफ खात्यातील शिल्लक रक्कमेवर 12 महिन्यांचं व्याज देण्यात येतं. अर्थात जर चालू आर्थिक वर्षात जर त्यातून काही रक्कम काढली गेली. तर मग व्याजाची रक्कम पण कमी होते.

पण याचा अर्थ असा नाही की जी रक्कम तुम्ही काढली आहे, त्यावर व्याजच मिळणार नाही. सदर रक्कम तुम्ही ज्या दिवशी काढली, त्याच्या अगोदर त्या रक्कमेवरील व्याज देण्यात येते. त्यामुळे सुरुवातीचे कोणतेही नुकसान होत नाही. पण ज्या दिवशी रक्कम काढण्यात आली. त्यादिवसापासून सदर काढलेल्या रक्कमेवर व्याज देण्यात येत नाही.

जर आर्थिक वर्षात तुमच्या EPF खात्यात नवीन रक्कम जाम झाली तर त्यावरील व्याज जमा होण्याच्या पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ते 31 मार्चपर्यंत देण्यात येते. तर व्याजाची जी रक्कम जमा आहे. त्याच्या एकूण रक्कमेवर व्याज देण्यात येते. हा पण एक फायदा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *