Headlines

अमेरिका इराण युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, म्हणाले, ‘इराण लवकरच…’

अमेरिका इराण युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, म्हणाले, ‘इराण लवकरच…’
अमेरिका इराण युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, म्हणाले, ‘इराण लवकरच…’


अमेरिका आणि इराण यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ला होत आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G-7 देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत मोठा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण लवकरच शरणागती पत्करणार आहे असं म्हटलं आहे. ही माहिती एक्सिओसच्या अहवालातून समोर आली असून G-7 देशांतील तीन अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. त्यांमुळे आता इराण खरंच माघार घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराण आता शरणागतीच्या उंबरठ्यावर

समोर आलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘आपण एक असा कर्करोग संपवला आहे जो आपणा सर्वांसाठी धोकादायक होता.’ यावेळी ट्रम्प यांनी ऑपरेशन एपिक फ्युरीबाबत समाधान व्यक्त करत इराण आता शरणागतीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा केला. मात्र या अहवालावर व्हाईट हाऊसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

इराणचे मोठे नुकसान

G-7 देशांच्या बैठकीत ट्रम्प यांनी असेही म्हटले की, इराणमध्ये आता स्पष्ट नेतृत्व उरलेले नाही, त्यामुळे शरणागती जाहीर करणारा कोणीही उरलेला नाही. इराणच्या नेतृत्वाला मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले असून त्यामुळे सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे.’ दरम्यान दोन आठव्यांपासून इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. इराणच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे अशावेळी अमेरिकेने हे विधान केले आहे.

इराण मात्र युद्ध सुरू ठेवणार

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही इराणच्या नेत्यांना वेडे असे संबोधले होते. आता त्यांनी इराण शरणागरी पत्करणार असल्याची भाषा केली आहे. मात्र दुसरीकडे इराणकडून वेगळेच संकेत मिळत आहेत. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी लढा सुरू ठेवण्याची शपथ घेतली असून हार्मुझच्या सामुद्रधुणीतून होणारा व्यापार थांबवण्यासाठी दबाव वाढवण्याची धमकी दिली. त्यामुळे हे युद्ध लवकर या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *