BAN vs PAK : पाकिस्तानकडून पहिल्या पराभवाचा अचूक हिशोब, बांगलादेशचा 128 धावांनी धुव्वा

BAN vs PAK : पाकिस्तानकडून पहिल्या पराभवाचा अचूक हिशोब, बांगलादेशचा 128 धावांनी धुव्वा
BAN vs PAK : पाकिस्तानकडून पहिल्या पराभवाचा अचूक हिशोब, बांगलादेशचा 128 धावांनी धुव्वा


पाकिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर पहिलावहिला आंतरराष्ट्रीय सामना जिंकला आहे. पाकिस्तानची बांग्लादेश विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पराभवाने सुरुवात झाली. बांगलादेशने विजयी सुरुवातीसह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली होती. त्यामुळे पाकिस्तानसाठी दुसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने करो या मरो असा होता. मात्र पाकिस्तानने शाहीन शाह याच्या नेतृत्वात दुसऱ्या सामन्यात विजयाचं खात उघडलं. पाकिस्तानने मोठ्या फरकाने हा सामना जिंकत पहिल्या पराभवाची अचूक परतफेड केली. माज सदाकत हा पाकिस्तानच्या विजयाचा खरा हिरो ठरला. त्याने बॅट आणि बॉलिंगने कमाल योगदान दिलं. पाकिस्तानने यासह या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

पाकिस्तानकडून पहिल्या पराभवाचा अचूक हिशोब

बांगलादेशने पाकिस्तानवर 11 मार्च रोजी पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला होता. बांगलादेशने पाकिस्तानला 114 धावांवर गुंडाळलं होतं. त्यानंतर बांगलादेशने 115 धावांचं आव्हान हे 15.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. तर आता पाकिस्तानने 13 मार्च रोजी 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने सामना आपल्या नावावर केला आहे. पाकिस्तानने बांगलादेशसमोर 47.3 ऑलआऊट 274 धावा केल्या होत्या. मात्र सामन्यादरम्यान दुसऱ्या डावात व्यत्यय आला. त्यामुळे बांगलादेशला 32 ओव्हरमध्ये 243 रन्सचं टार्गेट मिळालं. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांनी बांगलादेशला 23.3 ओव्हरमध्ये 114 रन्सवर ऑलआऊट केलं. पाकिस्तानने अशाप्रकारे हा सामना 128 धावांनी जिंकत पहिल्या पराभवाची परतफेडही केली.

सामन्यात काय झालं?

बांगलादेशने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी बोलावलं. माझ सदाकत या ओपनर बॅट्समनने पाकिस्तानला कडक सुरुवात मिळवून दिली. माजने 46 बॉलमध्ये 6 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने एकूण आणि सर्वाधिक 75 धावा केल्या. तसेच सलमान आघा याने 64 धावांचं योगदान दिलं. मोहम्मद रिझवान 44 आणि साहिबझादा फरहान याने 31 धावांचं योगदान दिलं. या चौघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानला 274 धावांचा आकडा गाठता आला.

माझने बॅटिगनंतर बॉलिंगने कमाल केली.माझने 5 ओव्हरमध्ये 23 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स मिळवल्या. माजने बांगलादेशच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हरीस रौफ यानेही 3 विकेट्स घेत बांगलादेशला बॅकफुटवर ढकललं. कॅप्टन शाहीन अफ्रिदी याने 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवून बांगलादेशचं पॅकअप केलं. पाकिस्तानने अशाप्रकारे बांगलादेशला 114 धावांवर गुंडाळलं. तर पाकिस्तानसाठी बॅटिंग आणि बॉलिंगने दुहेरी योगदान देणारा माझ ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *