Headlines

Iran-Israeal War : आकाशातही बसणार युद्धाचे चटके ! विमान प्रवास महागणार, IndiGo घेतला मोठा निर्णय

Iran-Israeal War :  आकाशातही बसणार युद्धाचे चटके ! विमान प्रवास महागणार, IndiGo घेतला मोठा निर्णय
Iran-Israeal War :  आकाशातही बसणार युद्धाचे चटके ! विमान प्रवास महागणार, IndiGo घेतला मोठा निर्णय


विमान प्रवास महागण्याची शक्यता

IndiGo Levy Fuel Charges: युद्ध तीन देशांमध्ये पण फटका सगळ्या जगाला. इराण वि. इस्रायल-अमेरिकेच्या युद्धाच्या भुर्दंड अख्ख्या जगाला सहन करावा लागत असून भारतातही कमी झळा बसत नाहीयेत. मिडल ईस्टमध्लया या युद्धाचा परिणाम दैनंदिन जीवनावरती देखील होत असून आता त्याचे चटके आकाशातही बसणार आहेत. कारण या युद्धाचा परिणाम हवाई प्रवासावरही होणार आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने (IndiGo)तिकिटांवर नवीन इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 मार्च, म्हणजे आजपासूनच मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर 425 ते 2,300 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाईल अशी घोषणा कंपनीद्वारे करण्यात आली आहे. वाढत्या खर्चाच्या दबावामुळे हे इंधन शुल्क लागू केले जात आहे, ज्यामुळे येत्या काळात प्रवाशांसाठी विमान प्रवास काहीसा महाग होऊ शकतो असं विमान कंपनीचं म्हणणं आहे.

425 ते 2300 पर्यंत द्याव लागू शकतं इंधन शुल्क

वेगवेगळ्या मार्गांनुसार इंधन शुल्क निश्चित करण्यात आल्याचं इंडिगोने सांगितलं.

– भारतीय उपखंडातील देशांतर्गत उड्डाणे आणि मार्ग: 425 रुपये

– मध्य पूर्वेकडील उड्डाणे: 900 रुपये

– आग्नेय आशिया, चीन, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील उड्डाणे: 1800 रुपये

– युरोपमधील उड्डाणे: 2300 रुपये

या अतिरिक्त शुल्कामुळे एकूण तिकिटांच्या किमतीत वाढ होणार असून त्याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होईल.

जेट इंधनाच्या किमतीत मोठी वाढ

एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) हा विमान उद्योगातील सर्वात मोठा खर्च आहे. विमान कंपनीच्या एकूण ऑपरेटिंग खर्चाच्या अंदाजे 40 % वाचटा हाइंधनाचा असतो. मध्य पूर्वेत सध्या असलेल्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या आणि जेट इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे विमान कंपनीच्या खर्चात अचानक वाढ झाली आहे, ज्यामुळे हे अतिरिक्त शुल्क आकारला जात आहे असं इंडिगोचे म्हणणं आहे.

प्रवाशांच्या खिशावर भार

जर इंधनाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीचा संपूर्ण परिणाम तिकिटांच्या किमतींमध्ये समाविष्ट करण्यात आला, तर भाडं किंवा तिकीटाचे दर लक्षणीयरीत्या वाढवावे लागेल. मात्र, प्रवाशांवर भार पडू नये म्हणून, सध्या तुलनेने कमी इंधन शुल्क लागू करण्यात आले आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे. खर्चाच्या दबावाची अंशतः भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे असंही कंपनीतर्फे नमूद करण्यात आलं.

Air India ने लावलं इंधन शुल्क

मात्र, हे पाऊल उचलणारी इंडिगो ही एकमेव विमान कंपनी नाही. 10 मार्च रोजी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसनेही तिकिटांवर फ्यूल सरचार्ज जाहीर केला. जर कच्च्या तेलाच्या आणि जेट इंधनाच्या किमती वाढत राहिल्या तर भविष्यात इतर विमान कंपन्याही भाडे वाढवू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *