Sonom Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या सुटकेचे आदेश, NSA वरून सर्वात मोठा यु-टर्न, गृहमंत्रालयाचा आदेश काय?

Sonom Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या सुटकेचे आदेश, NSA वरून सर्वात मोठा यु-टर्न, गृहमंत्रालयाचा आदेश काय?
Sonom Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या सुटकेचे आदेश, NSA वरून सर्वात मोठा यु-टर्न, गृहमंत्रालयाचा आदेश काय?


सोनम वांगचुक यांची सुटकाImage Credit source: गुगल

Sonam Wangchuk Released News: लडाखमधील पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वागंचुक यांना नजर कैदेत ठेवण्यात आल्याचा निर्णय जितका वादग्रस्त ठरला. तितकीच त्यांची सुटकाही चर्चेत आली आहे. गृह मंत्रालयाने त्यांची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते नजरकैदेत होते. त्यांची अटक रद्द करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. केंद्र सरकारच्या या यु-टर्नची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. सरकारने हा निर्णय का घेतला याविषयी उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत नजरकैद, मग युटर्न

केंद्र सरकार लडाखमध्ये शांतता, स्थिरतेसाठी आणि परस्पर सामंजस्यासाठी वचनबद्ध असून त्यासाठी वातावरण तयार करण्यात येत असल्याचे या सुटकेप्रकरणी सरकारने म्हटले आहे. योग विचार विनिमयानंतर सोनम वांगचुक यांची अटक तात्काळ रद्द करण्यात येत असल्याचे सरकारने स्पष्ट केले. सरकार लडाखमधील विविध संघटना आणि नेत्यांशी संपर्क करत आहे, वांगचुक यांची सुटका हा त्याचाच एक भाग मानल्या जात आहे. सध्याचे बंद आणि निषेधाचे वातावणर या शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना बाधक असल्याचे सरकारचे मत आहे. त्याचा लडाखच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाला आहे. लडाखमध्ये शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही वागंचुक यांची सुटका करताना देण्यात आली. 6 महिन्यांपासून ते नजरकैदेत होते. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत ही सुटका केली आहे. पण अचानक सरकारने हा निर्णय का घेतला याची चर्चा सुरू आहे.

सहा महिन्यांपूर्वी केली होती अटक

लडाख राज्य करावे यामागणीसाठी सोनम वांगचुक यांनी आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर सोनम वांगचुक यांच्या हेतूवर शंका व्यक्त करत त्यांना 26 सप्टेंबर 2025 मध्ये लेह येथे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली होती. लेहमध्ये आंदोलनात हिंसाचार झाला होता. त्याला वांगचुक हेच जबाबदार असल्याचा ठपका केंद्र सरकारने ठेवला होता. त्यानंतर NSA अंतर्गत वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले होते. या हिंसाचारात 90 लोक जखमी झाले होते. पुढे वांगचुक यांना राजस्थानमधील जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात काही सेलही सक्रिय झाले होते. पण आता केंद्राच्या भूमिकेने त्यांच्या अटकेचा मुद्दा मात्र अनुत्तरीतच राहिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *