साडी नेसून महिलेचं एस्केलेटरवर अजब कृत्य, नेटकरी प्रचंड भडकले; Video पाहून तुम्हालाही येईल राग!

साडी नेसून महिलेचं एस्केलेटरवर अजब कृत्य, नेटकरी प्रचंड भडकले; Video पाहून तुम्हालाही येईल राग!
साडी नेसून महिलेचं एस्केलेटरवर अजब कृत्य, नेटकरी प्रचंड भडकले; Video पाहून तुम्हालाही येईल राग!


आजकाल व्हायरल होण्यासाठी लोक विचित्र आणि कधीकधी तर धोकादायक कृत्य करताना दिसतात. आता या एका महिलेचंच उदाहरण घ्या. या महिलेने एस्केलेटरजवळ जे काही केलं ते पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारला आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही महिला कुठली आहे? हा व्हिडीओ नेमका मेट्रो स्थानकातील आहे की रेल्वे स्थानकातला? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शॉपिंग मॉल, रेल्वे स्टेशन आणि मेट्रो स्टेशनवर लोकांच्या सोयीसाठी एस्केलेटर बसवलेले असतात. मात्र काही लोक त्याचा गैरवापर करताना दिसतात. रील बनवण्याच्या नादात लोक एस्केलेटरवर अशा काही हरकती करतात की पाहणाऱ्यांचं डोकंच फिरत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत, तर अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये साडी नेसलेली एक महिला एस्केलेटरजवळ विचित्र प्रकार करताना दिसते. अनेकांच्या मते तिचं वागणं धोकादायक आणि निष्काळजीपणाचं आहे. हा प्रकार एखाद्या मॉल, रेल्वे स्टेशन किंवा मेट्रो स्टेशनचा असल्याचं दिसतं.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हिडीओमध्ये दिसतं की साडी नेसलेली महिला एस्केलेटरच्या बाजूला असलेल्या रेलिंगवर चढते. तिला असं करताना पाहून एस्केलेटरवरून जाणारे लोकही आश्चर्यचकित होतात. त्यानंतर ती थेट चालू असलेल्या एस्केलेटरवर उडी मारते. यानंतर ती एस्केलेटरच्या दिशेच्या उलट म्हणजे मागच्या बाजूने धावत खाली उतरू लागते. विचित्र हालचाली करत ती काही सेकंदांतच खाली पोहोचते. हा सगळा प्रकार काही सेकंदांचा असला तरी तो पाहून अनेकांचा पारा चढला असून लोकांनी या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर @desimojito या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, “काही वाईट घडल तर हेच लोक सरकारलाच दोष देतील.” अवघ्या 20 सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत 6 लाख 36 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 3 हजारांपेक्षा जास्त लोकांनी त्याला लाईकही केलं आहे. याशिवाय अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आपलं मत व्यक्त केलं आहे. व्हिडीओ पाहून एका युजरने लिहिलं की, “सरकार अशा लोकांवर कारवाई करत नाही, म्हणूनच त्यांचं मनोबल वाढतं. सोशल मीडिया कंपन्यांनी अशा लोकांना प्लॅटफॉर्मवरून हटवलं पाहिजे.” तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, फक्त लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी रील्स बनवण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांची लाज वाटते. आणि जर काही चुकीचं घडलं, तर हेच लोक सर्वात आधी सरकारवर आरोप करतात. जबाबदारी दोन्ही बाजूंनी निभावली गेली पाहिजे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *