Headlines

Virat Kohli : रोहित आणि गेलपैकी सर्वोत्तम टी 20 ओपनर कोण? विराटने कुणाचं नाव घेतलं?

Virat Kohli : रोहित आणि गेलपैकी सर्वोत्तम टी 20 ओपनर कोण? विराटने कुणाचं नाव घेतलं?
Virat Kohli : रोहित आणि गेलपैकी सर्वोत्तम टी 20 ओपनर कोण? विराटने कुणाचं नाव घेतलं?


रोहित शर्मा आणि ख्रिस गेल हे क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम आजी माजी फलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेट विश्वात विशेष करुन टी 20 फॉर्मटेमध्ये कायमच सर्वोत्तम फलंदाज/गोलंदाज कोण? याची चर्चा पाहायला मिळते. भारतीय चाहत्यांना रोहित शर्मा हा सरस फलंदाज वाटतो. तर काहींना ख्रिस गेल हा रोहितपेक्षा भारी वाटतो. मात्र ही क्रिकेट चाहत्यांची मतं झाली. मात्र टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने रोहित आणि गिलपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण? या प्रश्नाचं काय उत्तर दिलं? याबाबत आपण जाणून घेऊयात. विराटला टी 20 क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाज कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. विराटने टी 20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण? या प्रश्नावर फार वेळ न घेता ख्रिस गेल असं उत्तर दिलं. विराटच्या या उत्तराची सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळत आहे.

आयीपएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सर्वच संघांकडून सोशल मीडियावर वातावरणनिर्मिती केली जात आहे. आपल्या संघातील खेळाडूंचे फोटो तसेच सरावादरम्यानचे शॉर्ट व्हीडिओ शेअर करुन चाहत्यांचं लक्ष वेधण्याचे प्रयत्न केलं जात आहेत. आरसीबीनेही असाच विराटचा छोटा व्हीडिओ त्यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.

विराटचा व्हीडिओ व्हायरल

या व्हीडिओत विराटसोबत ‘This or That’ हा गेम सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या गेमच्या नियमानुसार दोघांपैकी सर्वोत्तम एका खेळाडूला निवडायचंय. व्हीडिओला सुरुवात होते. विराट एडन गिलख्रिस्ट आणि सुनील नारायण या दोघांनी गिलख्रिस्ट याची निवड करतो. विराट त्यानंतर गिलख्रिस्ट आणि ट्रेव्हिस हेड या दोघांपैकी हेडची निवड करतो. अशाप्रकारे हा खेळ सुरु असतो. विराट सहजासहजी दोघांपैकी एकाची निवड करत असतो. सर्वात शेवटी टी 20 मध्ये रोहित आणि गेलपैकी सर्वोत्तम टी 20 ओपनर कोण? असा प्रश्न विराटला केला जातो. विराट यावर सहज गेल असं उत्तर देतो.

आरसीबीचा पहिला सामना कधी?

दरम्यान आरसीबी गतविजेता आहे. आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात 18 व्या मोसमात पंजाब किंग्सला पराभूत करुन पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर आता आरसीबी 19 व्या मोसमातील पहिल्याच दिवशी आपला पहिला सामना खेळणार आहे. आरसीबीसमोर 28 मार्चला सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. आरसीबी 19 व्या मोसमाच्या मोहिमेतील आपला पहिला सामना घरच्या मैदानात खेळणार आहे. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *