Headlines

‘दृश्यम’पेक्षाही जबरदस्त क्राइम थ्रिलर; IMDb वर 10 पैकी 8.2 रेटिंग

‘दृश्यम’पेक्षाही जबरदस्त क्राइम थ्रिलर; IMDb वर 10 पैकी 8.2 रेटिंग
‘दृश्यम’पेक्षाही जबरदस्त क्राइम थ्रिलर; IMDb वर 10 पैकी 8.2 रेटिंग


ओटीटीवर पाहू शकता हा चित्रपटImage Credit source: Instagram

तुम्हाला जर क्राइम थ्रिलर चित्रपटांची आवड असेल तर जियो हॉटस्टारवर असाच एक चित्रपट स्ट्रीम होतोय. हा चित्रपट दहा वर्षांपूर्वी 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु आजसुद्धा जर एखाद्याला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील उत्तम क्राइम थ्रिलर सजेस्ट करायचा असेल तर या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं. मूळ तमिळ भाषेतील या मास्टरपीसचं नाव ‘ध्रुवंगल पटिनारू’ (D-16) असं आहे. या चित्रपटाचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे याचं दिग्दर्शन कार्तिक नरेन याने केलं आहे. कार्तिक त्यावेळी फक्त 21 वर्षांचा होता, ज्यावेळी त्याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटातून कार्तिकने हे सिद्ध केलं की जर कथा दमदार असेल तर चित्रपटाला यशस्वी बनवण्यासाठी मोठ्या बजेटची नाही तर ते तीक्ष्ण बुद्धिमत्तेची गरज असते.

या चित्रपटाची कथा एका निवृत्त पोलिस अधिकारी दीपकभोवती (रहमान) फिरते. एका अपघातात दीपकला त्याचे पाय गमवावे लागतात. तो त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या आणि अपूर्ण राहिलेल्या केसबद्दल सांगतो, ज्यामध्ये एकाच रात्रीत तीन वेगवेगळ्या घटना (अपघात, आत्महत्या आणि हत्या) घडतात. या चित्रपटाची कथा अगदी सरळ रेषेत पुढे जात नाही तर टप्प्याटप्प्याने ते उलगडत जातं. या चित्रपटाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना असा धक्का देतो ज्याची कल्पना करणंही कठीण आहे. यामध्ये पोलिसांचा तपास अतिशय बारकाईने दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. हिंदीत अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. याआधी कन्नडमध्येही त्याचा रिमेक बनवण्यात आला होता. ‘दृष्य’ असं त्याचं नाव होतं.

विशेष म्हणजे या चित्रपटाची लांबीही फार नाहीये. फक्त एक तास 45 मिनिटांचा हा चित्रपट जियो हॉटस्टारवर तुम्ही पाहू शकता. याला आयएमडीबीवर 8.2 रेटिंग मिळाली असून या चित्रपटाने अनेक पुरस्कारसुद्धा जिंकले आहेत. जर तुम्हाला अजय देवगनच्या ‘दृश्यम’सारखे क्राइम सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर तुम्हाला हा चित्रपट देखील नक्कीच आवडेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *