Headlines

इतकं घाणेरडं, अश्लील गाणं का लिहिलं? नोरा फतेहीच्या ‘सरके चुनर’ गाण्याच्या वादावर गीतकाराची उडवाउडवीची उत्तरं

इतकं घाणेरडं, अश्लील गाणं का लिहिलं? नोरा फतेहीच्या ‘सरके चुनर’ गाण्याच्या वादावर गीतकाराची उडवाउडवीची उत्तरं
इतकं घाणेरडं, अश्लील गाणं का लिहिलं? नोरा फतेहीच्या ‘सरके चुनर’ गाण्याच्या वादावर गीतकाराची उडवाउडवीची उत्तरं


‘केडी : द डेविल’ या चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या गाण्याचे बोल अत्यंत अश्लील, दुहेरी अर्थाचे असून त्यावरील कोरिओग्राफीसुद्धा बीभत्स असल्याची टीका होत आहे. या गाण्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर अखेर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नोटीस पाठवत हे गाणं सर्व प्लॅटफॉर्म्सवरून काढून टाकण्याचे आदेश दिले. नोरा फतेही आणि संजय दत्त यांचं हे गाणं वादानंतर सर्व प्लॅटफॉर्म्सवरून हटवण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रेमने केलं असून रकीब आलमने गाण्याचे बोल लिहिले आहेत. आता वादावर अखेर रकीबने मौन सोडलं आहे. “केडीमधील हे गाणं दिग्दर्शकाचं व्हर्जन आहे. मी ते गाणं लिहिण्यात नकार दिला होता आणि हे गाणं अजिबात चालणार नाही, असंही हजार वेळा सांगितलं होतं”, असं स्पष्टीकरण रकीबने दिलं आहे.

एनडी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत रकीबने आपली बाजू मांडत सांगितलं, “माझं नाव कसं समोर आलं ते मला माहीत नाही. हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून मला सतत फोन कॉल्स, मेसेजेस येत आहेत. सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. मी ते गाणं लिहिलंच नाही. मी फक्त जसंच्या तसं त्याचं भाषांतर केलं आहे. कारण दिग्दर्शक प्रेम ऐकायलाच तयार नव्हते. त्यांनी मला सांगितलं की कन्नड भाषेत हे गाणं जसं लिहिलं आहे, तसंच त्याचं हिंदीत भाषांतर कर. मी फक्त भाषांतर केलं आणि त्यांना स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या गाण्याला सेन्सॉर बोर्ड पास करणार नाही. परंतु ते वारंवार हेच सांगत होते की, काय करायचं ते बघून घेऊयात. दिग्दर्शकांना तर कॉन्ट्रोव्हर्सीच हवी होती. त्यांनी अनुवादित गाणं जसंच्या तसं चित्रपटात वापरलं आहे. त्याचे परिणाम तुम्ही पाहतच आहात.”

वादानंतर दिग्दर्शकांची प्रतिक्रिया काय आहे, असा प्रश्न रकीबला विचारला असता, तो पुढे म्हणाला, “मी त्यांना म्हटलंय की या गाण्याला बदला, त्याला माझं नाव दिलं आहे. मी रात्रभर बसून या गाण्याला पुन्हा लिहिलं आहे. ‘बोतल में दारू, दारू नशा है, नशा शरारत की वजह है,’ असे हे बोल आहेत. दिग्दर्शक वारंवार याच गोष्टीवर जोर देत आहेत की गाण्यात ‘बोतल’ आणि ‘अचार’ हे शब्द असावेत. त्यांचा सर्व जोर याच गोष्टीवर आहे. इतक्या मर्यादा ओलांडल्यानंतरही ते ऐकत नाहीयेत.”

संजय दत्त आणि नोरा फतेही यांच्यावर हे गाणं चित्रित झालं, तेव्हा त्यांनासुद्धा त्याचे बोल खटकले नाहीत का, असाही सवाल रकीबला विचारण्यात आला. “हे पहा.. माझ्याकडून फक्त गाण्याचं भाषांतर करून घेण्यात आलं होतं. त्यानंतर मला काहीच माहीत नाही. कदाचित नोरा आणि संजय यांनी कन्नड भाषेत ते गाणं परफॉर्म केलं असेल”, अशी शक्यता त्याने वर्तवली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *