Headlines

Aishwarya Rai Bachchan: … म्हणून ऐश्वर्या एका जागी 6 – 7 तास उभी होती, अनेक वर्षांनंतर सत्य अखेर समोर आलंच

Aishwarya Rai Bachchan: … म्हणून ऐश्वर्या एका जागी 6 – 7 तास  उभी होती, अनेक वर्षांनंतर सत्य अखेर समोर आलंच
Aishwarya Rai Bachchan: … म्हणून ऐश्वर्या एका जागी 6 – 7 तास  उभी होती, अनेक वर्षांनंतर सत्य अखेर समोर आलंच


Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. अभिनेत्रीबद्दल अनेकांनी मोठं वक्तव्य देखील केलं आहे. आता देखील प्रतीक्षा प्रशांत हिने ऐश्वर्या हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. प्रतीक्षा प्रशांत हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, हैदराबादमधील एक प्रतिष्ठित ज्वेलरी हाऊस सांभाळतात… ‘पोन्नियिन सेल्वन 2’ सिनेमात प्रतीक्षा हिने ऐश्वर्या हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. शिवाय दागिन्यांबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या…
ऐश्वर्या राय हिच्या प्रोफेशनलिज्मबद्दल मोठं वक्तव्य करत प्रतीक्षा म्हणाल्या, ‘ती अशीच ऐश्वर्या राय नाहीये…. ती तिचं प्रत्येक काम सुनिश्चित करत असते… स्वतःचा ड्रेस… स्टाईल.. कपडे… एवढंच नाही तर, केसात लावलेली पीन देखील दिसता कामा नये… याची ती काळजी घेत असते…’

प्रतीक्षा पुढे म्हणाली, ‘ऐश्वर्या स्वतःच्या प्रत्येक लूकची काळजी घेत असते… ती प्रचंड प्रोफेशनल आहे… मला एक सीन आठवत आहे. जेव्हा ऐश्वर्या हिला ऑर्गेंझा साडी देण्यात आली होती… साडीची घडी मोडेल आणि ते स्क्रिनवर व्यवस्थीत दिसणार नाही म्हणून ऐश्वर्या सहा ते सात तास बसली नव्हती… हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे…’

‘पोन्नियिन सेल्वन’ हा सिनेमा दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला होता. तो दोन भागांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यात ऐश्वर्याने नंदिनीची भूमिका साकारली होती. ‘पोन्नियिन सेल्वन 2’ मधील तिच्या कामासाठी ऐश्वर्याला प्रशंसा मिळाली आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेला SIIMA पुरस्कारही मिळाला. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – समीक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, आज अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 90 च्या दशकात मोठ्या पडद्यावर ऐश्वर्या हिचा बोलबाला होता. पण आजही चाहते अभिनेत्रीला विसरू शकलेले नाही. ऐश्वर्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात…

एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आलेली. ‘हम दिल दे चुके समन’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ऐश्वर्या आणि अभिनेता सलमान खान यांच्यात प्रेम बहरलं. चाहत्यांमध्ये दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरलेला, पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. आज ऐश्वर्य, अभिषेक आणि लेक आराध्या यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *