Headlines

America, Israel Iran War : चीनची युद्धात उडी? अमेरिका, इस्त्रायलचे धाबे दणाणले, आता भयंकर युद्ध होणार

America, Israel Iran War : चीनची युद्धात उडी? अमेरिका, इस्त्रायलचे धाबे दणाणले, आता भयंकर युद्ध होणार
America, Israel Iran War : चीनची युद्धात उडी? अमेरिका, इस्त्रायलचे धाबे दणाणले, आता भयंकर युद्ध होणार


युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणकडून इस्त्रायल आणि अमेरिकेवर मिसाईल हल्ले सुरूच आहेत. इराणच्या हल्ल्यांमुळे इस्त्रालयमध्ये हाहाकार उडाला आहे. तर इराण सैन्य तळांवर इतके अचूक हल्ले कसे काय करू शकतो? असा प्रश्न अमेरिकेला पडला आहे. यावरून काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनं रशियावर आरोप केला होता. रशिया इराणला आमच्या सैन्य तळांची गुप्त माहिती पुरवत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं होतं. मात्र रशियानं अमेरिकेचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर आता अमेरिकेतून एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणावादरम्यान आता अमेरिकेमधून एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये चीन या युद्धात इराणची मदत करत असल्याचं म्हटलं आहे. चीन इराणला सैन्य आणि तांत्रिक आघाडीवर मदत करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीन इराणला ड्रोन, जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे, रॉकेट फ्यूल बनवण्यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान पुरवत असल्यचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हा रिपोर्ट यूस, चायना इकोनॉमिक अँन्ड रिव्हू कमीशनकडून जारी करण्यात आला आहे.

या रिपोर्टमध्ये पुढे असाही दावा करण्यात आला आहे की, 2 मार्चला चीनचे दोन जहाज असं केमिकल घेऊन इराणच्या दिशेनं गेले, ज्या केमिकलचा उपयोग हा रॉकेटचं इंधन बनवण्यासाठी होतो. ज्यामध्ये सोडियम परक्लोरेट होतं. चीन आता आपली रनणिती बदलत आहे. युद्ध सुरू झालं तेव्हा आखाती देशांसोबत आपले संबंध खराब होतील या भीतीनं चीन इराणला थेट सैन्य मदत देत नव्हता, फक्त तंत्रज्ञानाचा पुरवठा करत होता. मात्र आता चीन इराणला थेट मदत करत आहे. एवढंच नाही तर इराणकडून चीनच्या नेव्हिगेशन सिस्टिमचा देखील वापर केला जात असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान सध्या मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अशावेळी हा रिपोर्ट आल्यानं या रिपोर्टमुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *