Headlines

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदासाठी डावखुऱ्या फलंदाजाची केली निवड, अधिकृत शिक्कामोर्तब

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदासाठी डावखुऱ्या फलंदाजाची केली निवड, अधिकृत शिक्कामोर्तब
IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदासाठी डावखुऱ्या फलंदाजाची केली निवड, अधिकृत शिक्कामोर्तब


IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदासाठी डावखुऱ्या फलंदाजाची केली निवड, अधिकृत शिक्कामोर्तबImage Credit source: PTI

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं कर्णधारपदाचं कोडं अखेर सुटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पॅट कमिन्स बरा होईल की याबाबत चर्चा रंगली होती. आता स्पर्धेच्या सुरूवातीच्या काही सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादकडे सुरूवातीच्या काही सामन्यांसाठी पर्याय शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे सुरूवातीला डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माचं नाव आघाडीवर होतं. पण सनरायझर्स हैदराबादने इशान किशनवर डाव लावला आहे. इशान किशन सनरायझर्स हैदराबाद संघाचं सुरूवातीच्या सामन्यात नेतृत्व करणार आहे. 18 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादने इशान किशनच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, पॅट कॅमिन्स दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे सुरूवातीच्या काही सामन्यात खेळू शकणार नाही. कमिन्स संघात परत येईपर्यंत इशान किशन सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा सांभाळेल. तर अभिषेक शर्मा हा उपकर्णधार असणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच इशान किशन आणि अभिषेक शर्मा ही जबाबदारी सांभाळणार आहेत. सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना 28 मार्चला गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. नाणेफेकीचा कौल होईल तेव्हा इशान किशन आणि रजत पाटिदार मैदानात असतील.

इशान किशनचा सध्याचा फॉर्म पाहता त्याच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली असावी असं बोललं जात आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत त्याने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने टीम इंडियाच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता. पण त्याच्याकडे कर्णधारपद सांभाळण्याचा तितका अनुभव नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीत त्याने कर्णधारपद भूषवलं होतं. तसेच संघाला जेतेपदही मिळवून दिलं होतं. त्यामुळे आता त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझीला आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज पॅट कमिन्स मागच्या दोन पर्वापासून सनरायझर्स हैदराबादचं कर्णधारपद भूषवत आहे. पण मागच्या काही महिन्यात दुखापतीने ग्रॉसला आहे. त्यामुळे एशेज कसोटी मालिकेतही एकच सामना खेळला. तसेच टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला मुकला. आता अपेक्षा आहे की, आयपीएल स्पर्धेच्या मध्यात संघात परतेल. अन्यथा इशान किशनलाच जबाबदारीचं धनुष्य पेलावं लागेल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *