
आकडेवारीनुसार, कंपनीची आर्थिक स्थिती एकदम मजबूत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीत कंपनीला 1,579 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या नफ्याच्या तुलनेत 1,311 कोटींच्या तुलनेत नफ्यात जवळपास 20 टक्क्यांची तेजी दिसून आली. कंपनीच्या महसूलात 24 टक्क्यांची वाढ होऊन तो 7,154 कोटी रुपयांवर पोहचला.