Headlines

आता सगळं संपलं, पाकिस्तान अणुबॉम्ब घेऊन थेट युद्धात…इराणच्या एका चुकीमुळे जग भयंकराच्या दारात!

आता सगळं संपलं, पाकिस्तान अणुबॉम्ब घेऊन थेट युद्धात…इराणच्या एका चुकीमुळे जग भयंकराच्या दारात!
आता सगळं संपलं, पाकिस्तान अणुबॉम्ब घेऊन थेट युद्धात…इराणच्या एका चुकीमुळे जग भयंकराच्या दारात!


Pakistan In Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढतो आहे. हे युद्ध सध्यातरी थांबवण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे भविष्यात भारतासह जगातील अनेक देशांमधील उर्जासंकट आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे युद्ध थांबण्याऐवजी त्यात आणखी काही देश ओढले जाण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या एका हल्ल्यानंतर आता इराणने आखाती देशांतील तेल प्रकल्पांना लक्ष्य करणे सुरू केले आहे. परिणामी आता इराणने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत यासारख्या देशांवरील हल्ल्यामुळे हे युद्ध आणखी वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे सौदी अरेबियावर हल्ले केल्याने आता पाकिस्तानदेखील या युद्धात उतरतो की काय आणि अणुबॉम्बच्या मदतीने हल्ले केले जातात की काय? असी भीती जगभरात व्यक्त केली जात आहे.

इराणकडून केले जातायत तेल प्रकल्पावर हल्ले

इस्रायलकडून इराणच्या तेल प्रकल्पांना आता लक्ष्य केले जात आहे. याला प्रत्युत्तर म्हणून आता इराणन हा देश आता सौदी अरेबिया, कुवेत, यूएई या देशांवर हल्ले करत आहे. या देशातील तेल प्रकल्पांना इराण लक्ष्य करतो आहे.या हल्ल्यांबाबत बोलताना आम्ही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले रोखल्याचे सांगितले आहे. तर यूएईनेही आम्ही एक तेल प्रकल्प संपूर्ण रिकामा केला आहे, असे सांगितले आहे. इराणकडून आणखी मोठे हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इतर आखाती देशांच्या तेल प्रकल्पांना इराणने लक्ष्य केलं तर हे आखाती देश इराणला जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. यामध्ये सौदी अरेबियाचाही समावेश आहे.

पाकिस्तान युद्धात कसा उतरू शकतो?

इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात एक संरक्षण सहकार्य करार झालेला आहे. या करारानुसार एका देशावर झालेला हल्ला हा दुसऱ्या देशावर झालेला हल्ला मानला जातो. त्यामुळेच इराणने सौदी अरेबियावर हल्ला केला तर या करारानुसार पाकिस्तान हादेखील या युद्धात उतरू शकतो. पाकिस्तान हा अणूबॉम्ब असलेला देश आहे. त्यामुळे सौदी अरेबियावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानदेखील या युद्धात ओढला जाऊ शकतो. करारानुसार पाकिस्तानला युद्धात उडी घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? पाकिस्तानने युद्धात उडी घेतलीच तर भविष्यात अणुबॉम्ब हल्ले केले जाणार का? असे प्रश्न उपस्थित झाल्याने जगाची चिंता वाढली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *