
रुपाली चाकणकर, रुपाली पाटील ठोंबरे, अशोक खरातImage Credit source: गुगल
Nashik Bhondu Baba Ashok Kharat: नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्या व्हिडिओने समाजमन हादरले आहे. कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. बुवाबाजीच्या आडून त्याने महिलांचे शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ पण समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. आता याप्रकरणावरून रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे. त्यांची फेसबूक पोस्ट राज्यात एकच चर्चेचा विषय ठरली आहे. भोंदू खरातचे अश्लील कारनामे समोर आल्यानंतर याप्रकरणात अनेक पुढाऱ्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा रंगली आहे.
रुपाली चाकणकर फरार
अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यांच्यात यापूर्वी सुद्धा अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. तर भोंदू अशोक खरात याच्या व्हिडिओवरून आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकरांवर मोठा हल्ला चढवला आहे. चाकणकरांचे या भोंदूसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर खासदार संजय राऊतांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आता रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ‘राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार … बजाव टाली’ असे लिहिले आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
अशोक खरात प्रकरणी SIT चौकशीला वेग
स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी SIT चौकशीला वेग आला आहे. डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हिडिओमधील पीडितांना न्याय देण्यावर भर देण्यात येत आहे. आर्थिक व्यवहार, खरातच नेटवर्क, सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार असल्याचे समजते. याप्रकरणी राज्यात संतापाची लाट असून वाढता दबाव पाहता याप्रकरणी तपासाची चक्र फिरल्याचे दिसते.
एक पिस्तूल, तीन जिवंत काडतूसं जप्त
भोंदू कॅप्टन खराच्या घरात सापडलेल्या पिस्तूल संदर्भात तपास सुरू करण्यात आला आहे. खरात याच्या घरातून एक पिस्तूल आणि तीन जिवंत काढतोस काल पोलिसांनी जप्त केले होते. भोंदू खरातकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना होता का ? पिस्तूल कोणाकडून कसे केव्हा कधी मिळवले याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पिस्तूलचा वापर धमकवण्यासाठी करायचा का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
भोंदू अशोक खरातचे आणखी एक कनेक्शन उघड
भोंदू अशोक खरातच्या दरबारात अनेक प्रशासकीय अधिकारी हजेरी लावत होते. त्याचे हे प्रशासकीय कनेक्शन आता उघड झाले आहे. या भोंदूने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केली आहे. पाथर्डी गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी ओझर विमानतळाच्या भागात कोट्यावधींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याने अनेकांच्या जमिनी हडपल्या तर काहींवर अवैध कब्जा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओझर परिसरात काही बांधकाम व्यवसायिकांसोबत या भोंदू खरातची भागीदारी होती. गेल्या आठवड्यात त्याने एका इमारतीच भूमिपूजन केल्याचे समोर आले आहे.