Headlines

IPL 2026 : केकेआरचा 19 व्या मोसमाआधी मोठा निर्णय, आकाश दीप याच्या जागी युवा गोलंदाजाचा समावेश, कुणाला संधी?

IPL 2026 : केकेआरचा 19 व्या मोसमाआधी मोठा निर्णय, आकाश दीप याच्या जागी युवा गोलंदाजाचा समावेश, कुणाला संधी?
IPL 2026 : केकेआरचा 19 व्या मोसमाआधी मोठा निर्णय, आकाश दीप याच्या जागी युवा गोलंदाजाचा समावेश, कुणाला संधी?


आयपीएलच्या 19 व्या मोसमाची 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त 6 दिवस बाकी आहेत. मात्र त्याआधी विविध संघांतील खेळाडूंना दुखापतीमुळे संपूर्ण 19 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे संबंधित संघांची डोकेदुखी वाढली आहे. इतर संघांच्या तुलनेत कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली झाली आहे. केकेआरच्या 2 गोलंदाजांना दुखापतीमुळे या 19 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे. या दोघांमध्ये हर्षित राणा आणि आकाश दीप यांचा समावेश आहे. त्यामुळे या दोघांच्या जागी कुणाला संधी मिळणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. अखेर केकेआर टीम मॅनेजमेंटने एका खेळाडूचा समावेश केला आहे.

केकेआर टीम मॅनेजमेंटने आकाश दीप याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. त्यानुसार वेगवान गोलंदाज सौरभ दुबे याला संधी देण्यात आली आहे.

क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, आकाश दीप याच्याजागी कोलकाता नाईट रायडर्स टीममध्ये सौरभ दुबे याला संधी देण्यात आली आहे. सौरभ देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाचं प्रतिनिधित्व करतो. सौरभ याआधी सनरायजर्स हैदराबाद टीममध्ये होता. मात्र त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली नाही.

केकेआरचा शोध सुरु

आकाश दीपच्या जागी आता सौरभला संधी देण्यात आलीय. मात्र केकेआरला हर्षित राणा याच्या जागी अपेक्षित बदली खेळाडू भेटत नाहीय. त्यामुळे अजूनही केकेआरने हर्षितच्या जागी कोण खेळणार? याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे हर्षितच्या जागी कुणाला आणि कधीपर्यंत संधी मिळणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना असणार आहे.

अनसोल्ड सौरभला संधी

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाआधी अबुधाबीत मिनी ऑक्शन पार पडलं. सौरभ या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. सौरभची 30 लाख रुपये बेस प्राईज होती. मात्र त्यानंतरही त्याला कुणी घेतलं नव्हतं. सौरभचं नाव त्या मिनी ऑक्शनमधील रजिस्टर्ड अवेलेबल प्लेअर पूल (RAPP) या यादीत 1215 व्या स्थानी होतं.

सौरभ दुबेचा समावेश

आयपीएलच्या नियमानुसार, बदली खेळाडू घेण्यासाठीही नियम आहे. नियमानुसार, कोणत्याही खेळाडूला बदली म्हणून घेण्यासाठी त्याचं नाव Rapp मध्ये असणं बंधनकारक असतं.

सौरभला आता संधी मिळालीय. त्यामुळे सौरभला आयपीएल पदार्पणाची प्रतिक्षा असणार आहे. सौरभने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 8 तर 3 टी 20 सामने खेळले आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *