Headlines

मुंबईसह संपूर्ण राज्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, दरात मोठा फेरबदल, आता बिनधास्त गाडीची टाकी करा फुल्ल

मुंबईसह संपूर्ण राज्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, दरात मोठा फेरबदल, आता बिनधास्त गाडीची टाकी करा फुल्ल
मुंबईसह संपूर्ण राज्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, दरात मोठा फेरबदल, आता बिनधास्त गाडीची टाकी करा फुल्ल


जर आज तुम्ही घराबाहेर पडणार असाल आणि गाडीची टाकी फुल करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आज २३ मार्च रोजी भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. विशेषतः मध्य पूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव आणि अमेरिका व इराण यांच्यात सुरू असलेल्या तीव्र युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या जागतिक घडामोडींमुळे भारतीय बाजारपेठेत इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे काही राज्यांत इंधन महागले आहे, तर काही ठिकाणी किमतीत कपात झाली आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत ऐतिहासिक वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या ४८ तासांच्या कडक अल्टिमेटमनंतर जागतिक तेल व्यापार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याचा परिणाम म्हणून सोमवारी जागतिक बेंचमार्क मानले जाणारे ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ११२.१७ डॉलरवर पोहोचले, तर अमेरिकन क्रूड (WTI) देखील १०० डॉलरच्या उंबरठ्यावर आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी, म्हणजेच अवघ्या काही आठवड्यांपूर्वी २७ फेब्रुवारी रोजी ब्रेंट क्रूडचा दर केवळ ७२.४८ डॉलर होता. अल्प कालावधीत झालेली ही मोठी दरवाढ आता सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम करताना दिसत आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय?

शहर पेट्रोल (₹) डिझेल (₹)
मुंबई १०३.५४ ९०.०३
दिल्ली ९४.७७ ८७.६७
कोलकाता १०५.४५ ९२.०२
चेन्नई १००.८४ ९२.३९

या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले

  • उत्तर प्रदेश: पेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल ६८ पैशांनी महागले.
  • झारखंड: पेट्रोल ७४ पैसे आणि डिझेल ७३ पैशांनी वाढले.
  • गोवा व केरळ: पेट्रोलच्या दरात ४४ पैशांची वाढ झाली आहे.
  • बिहार व तामिळनाडू: येथेही किमतीत किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान काही राज्यांत इंधनाचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ७ पैसे आणि डिझेल ९ पैशांनी स्वस्त झाले आहे. सध्या महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर १०५.४३ रुपये आहे. तर डिझेलचा दर ९१.९४ इतका आहे. तसेच गुजरातमध्ये पेट्रोल १९ पैसे तर डिझेल १७ पैशांनी स्वस्त झाले आहे. तसेच कर्नाटक पेट्रोलच्या दरात ४९ पैशांची मोठी कपात झाली आहे. मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी दरांमध्ये घट झाली आहे.

तुमच्या शहरातील दर घरबसल्या कसे तपासाल? 

IOCL: ‘RSP <सिटी कोड>’ लिहून 9224992249 वर पाठवा.

BPCL: ‘RSP <सिटी कोड>’ लिहून 9223112222 वर पाठवा.

HPCL: ‘HPPRICE <सिटी कोड>’ लिहून 9222201122 वर पाठवा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *