Headlines

खरात प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप, थेट राजीनाम्याची मागणी, राजकारणात खळबळ

खरात प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप, थेट राजीनाम्याची मागणी, राजकारणात खळबळ
खरात प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप, थेट राजीनाम्याची मागणी, राजकारणात खळबळ


नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक कारनामे समोर येताना पहायला मिळत आहे. राज्यातील अनेक राजकीय नेतेही अशोक खरातच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. अशातच आता राज्य सरकारने अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिराच्या विकासासाठी तत्कालीन महायुती सरकारने तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटन मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून हा निधी मंजूर करण्यात आला होता. याप्रकरणी आता शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांचे खरातसोबत संबंध – धंगेकर

रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, ‘भोंदू बाबा कॅप्टन खरातची हुजरेगिरी करण्यात आपले चंद्रकांतदादा पण कुठे मागे नाहीत. 31 मार्च, 2018 रोजी भोंदू कॅप्टन खरातच्या ईशान्येश्वर देवस्थान, मिरगांव, ता.सिन्नर संस्थानच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विकास कामांसाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाने 1 कोटी 50 लाख रुपये मंजूर केल्याचा जीआर हाती लागलाय. तेव्हा पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. आता मी तुम्हाला निधी देतो तुम्ही माझं काळ्याचं पांढरे करून द्या,या स्कीम अंतर्गत दादांचे देखील खरात सोबत आर्थिक संबंध असल्याचा तपास पोलिसांनी घ्यावा.’

चंद्रकांत पाटील यांनी मंत्रि‍पदावरून हटवा – धंगेकर

यानंतर बोलताना धंगेकर यांनी म्हटले की, ‘भोंदू बाबा अशोक खरात सोबत मंत्री चंद्रकांत पाटील सह पुण्यातील खासदाराची सुद्धा ऊठबस होती. नाशिक मधील ईशान्यश्वर देवस्थानाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा निधी मंजूर करून दिला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा झाला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून त्यांना मंत्रि‍पदावरून हटवलं पाहिजे.’

सपकाळ यांच्याही गंभीर आरोप

दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळते आहे. भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहित होते. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रीमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *