Headlines

Maharashtra News LIVE : भोंदू अशोक खरातच्या कार्यालयात SIT चं पथक दाखल

Maharashtra News LIVE : भोंदू अशोक खरातच्या कार्यालयात SIT चं पथक दाखल
Maharashtra News LIVE : भोंदू अशोक खरातच्या कार्यालयात SIT चं पथक दाखल


  • 26 Mar 2026 01:08 PM (IST)

    श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी जगातील वीस देशांमधून बुकिंग

    श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी जगातील वीस देशांमधून बुकिंग झाली आहे. भारतासह 20 देशांमधून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेचं ऑनलाईन बुकिंग झालं आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या महापूजा, तुळशी अर्चन पूजा, पाद्य पूजा अशा विविध पूजा ऑनलाईन बुकिंगमधून फुल झाले आहे. अमेरिका, दुबई, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा देशांमधून विठ्ठलाच्या पूजांचे बुकिंग झालं असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

  • 26 Mar 2026 12:55 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये राम जन्मोत्सव उत्साहात

    छत्रपती संभाजीनगरमध्ये राम जन्मोत्सव उत्साहात साजरी करण्यात आली. राम मंदिरा बाहेर मुस्लिम बांधवांच्या वतीने थंड पेयाचे वाटप करण्यात आले. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित आहेत.

  • 26 Mar 2026 12:45 PM (IST)

    साईमंदिरात रामजन्मोत्सव उत्साहाच्या वातावरणात सुरू

    शिर्डी साईमंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडतोय… रामजन्माचे किर्तन पार पडल्यानंतर चांदीच्या पाळण्यात प्रभु रामचंद्राची प्रतिमा ठेवुन रामजन्माचे स्वागत करण्यात आले.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते पाळण्याची दोर हलवत रामजन्माचे जल्लोषात स्वागत करण्यात आले…मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात हजारो साईभक्त सामिल झालेत…राम जन्माचा सोहळा पार पडल्यानंतर प्रभु रामचंद्राचा पाळणा साई समाधीवर ‌ठेवून साईबाबांची मध्यान्ह आरती पार पडेल…

  • 26 Mar 2026 12:30 PM (IST)

    श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष; बीडमध्ये दुचाकी शोभायात्रेने वेधले लक्ष

    जय श्रीराम… जय श्रीराम… या गजराने आज बीड शहर अक्षरशः दणाणून गेले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा उत्साह शहरात शिगेला पोहोचला असून रस्त्यावर भक्ती, उत्साह आणि भगव्या रंगाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. बार्शी नाका येथील गणपती मंदिरापासून निघालेली भव्य दुचाकी शोभायात्रा संपूर्ण शहरातून काढण्यात आली. शेकडो दुचाकींवर भगवे झेंडे फडकत आहेत, तर तरुणांच्या तोंडी जय श्रीरामचा गजर घुमतोय. डीजेच्या तालावर ताल धरत आणि घोषणांच्या आवाजात संपूर्ण वातावरण राममय झाले आहे.

  • 26 Mar 2026 12:15 PM (IST)

    नांदेड शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची अफवा पसरल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट

    नांदेड शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची अफवा पसरल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरलेली आहे. या अफवेच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा  लागल्या आहेत.  शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर टॅंक फुल करण्यासाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गर्दीमुळे काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील पोलीस पेट्रोल पंपावर विशेषतः मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या रांगेत पुरुष वाहनधारकांनी  घुसखोरी केली आहे.

  • 26 Mar 2026 12:06 PM (IST)

    सिंदखेडराजा येथिल पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी

    बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे आज पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक वाढलेल्या मागणीमुळे आणि संभाव्य इंधन तुटवड्याच्या चर्चेमुळे नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपावर लांबच लांब रांगा लावल्या.. दोनचाकी, चारचाकी तसेच व्यावसायिक वाहनांची मोठी वर्दळ झाल्याने परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक वाहनधारकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागल्याने गैरसोयीचा सामना करावा लागला.. दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन आणि पेट्रोल पंप व्यवस्थापनाकडून उपाययोजना सुरू असल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

  • 26 Mar 2026 12:00 PM (IST)

    नांदेड – पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची अफवा पसरल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट

    नांदेड शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची अफवा पसरल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली. या अफवेच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या.  शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर टॅंक फुल करण्यासाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. गर्दीमुळे काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती होती. मात्र नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

  • 26 Mar 2026 11:43 AM (IST)

    जालना शहारत पेट्रोल पंपवर नागरिकांची मोठी गर्दी

    जालना शहरातल्या चौधरी नगर भागातल्या पेट्रोल पंपवर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.  डिझेल घेण्यासाठी ग्रामीण भागातून ट्रॅक्टर मळणी यंत्र आणि हार्वेस्टर चालक कॅन घेऊन दाखल झालेत.  डिझेल मिळत नसल्याने ग्रामीण भागातील गहू काढणीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही अशी अफवा उडताच नागरिकांची धांदल उडाल्याने पेट्रोल पंपावर गर्दी होत आहे.

  • 26 Mar 2026 11:20 AM (IST)

    सातारा: पोलीस अधीक्षक तुषार दोषी पोलीस मुख्यालयात हजर

    सातारा: पोलीस अधीक्षक तुषार दोषी पोलीस मुख्यालयात हजर झाले असून त्यांनी दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली . जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदाच्या राड्यावरून तुषार दोषी चर्चेत आले होते.

  • 26 Mar 2026 11:09 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगर मध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा, पंपावर लांबच लांब रांगा.

    छत्रपती संभाजी नगर मध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा असल्याने गॅस पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शहरातील 25 पैकी केवळ दोनच पंप सुरू असल्याने रिक्षा चालकाची मोठी गर्दी झाली. त्यामुळे ऑटो रिक्षा चालकाच्या तब्बल एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.  रिक्षात गॅस भरण्यासाठी ऑटो चालक पाच तास रांगेत ताटकळले.

  • 26 Mar 2026 11:03 AM (IST)

    रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकमत

    रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकमत झालं आहे. मंगळवारी देवगिरीवर झालेल्या बैठकीत राजीनाम्यावर चर्चा झाली. चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आमदारांनी बैठकीत केली. आता चाकरणकर यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात आहे

  • 26 Mar 2026 10:57 AM (IST)

    अशोक खरात प्रकरणात राजकीय वळण, वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरांचे नाव

    नाशिकमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एक खळबळजनक माहिती समोर आली असून तपासाची दिशा राजकीय वर्तुळाकडे वळण्याची शक्यता आहे. २०१७ मधील खरातच्या वडिलांच्या दशक्रिया विधीची एक पत्रिका सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या पत्रिकेतील शोकाकुलांच्या यादीत चक्क राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव असल्याने राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पत्रिकेमुळे खरात आणि चाकणकर यांच्यातील संभाव्य निकटच्या संबंधांबाबत चर्चा रंगली असून, या प्रकरणामुळे भोंदू खरात प्रकरणाला आता नवे राजकीय परिमाण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 26 Mar 2026 10:47 AM (IST)

    सांगोल्यात टेम्पोची चार बैलगाड्यांना भीषण धडक; महिलासह बैलाचा जागीच मृत्यू

    सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावामध्ये एका भरधाव टेम्पोने चार बैलगाड्यांना चिरडल्याने भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एक महिला आणि एका बैलाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. वाकी शिवणे येथील काही कुटुंबे बैलगाडीने आरेवाडी येथील बिरोबाच्या दर्शनासाठी निघाली होती. मात्र, वाटेत चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोने एकापाठोपाठ एक अशा चार बैलगाड्यांना जोरदार धडक दिली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • 26 Mar 2026 10:37 AM (IST)

    जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पेट्रोल पंप ठप्प; इंधन साठा संपल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय

    जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काल सायंकाळपासून आणि मध्यरात्रीपासून अनेक पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याने नो स्टॉकचे फलक पाहायला मिळत आहेत. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या अनेक वाहनधारकांना इंधनाअभावी माघारी फिरावे लागले आहे. दरम्यान, आज सायंकाळपर्यंत इंधनाचे टँकर दाखल होतील, असा अंदाज पंपावरील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला असून तोपर्यंत महामार्गावरील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

  • 26 Mar 2026 10:27 AM (IST)

    सोलापुरात गॅस तुटवड्यामुळे ऑटो एलपीजी पंप १० दिवसांपासून बंद; रिक्षाचालकांसह कर्मचाऱ्यांचे हाल

    सोलापूर शहरातील नई जिंदगी भागातील ऑटो एलपीजी गॅस पंप गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्याने रिक्षाचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळे हा पंप बंद ठेवण्याची वेळ आली असून, याचा थेट फटका एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षांना बसला आहे. इंधन मिळत नसल्याने रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून, दुसरीकडे या पंपावर काम करणाऱ्या ८ ते १० कर्मचाऱ्यांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या कायम असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

  • 26 Mar 2026 10:17 AM (IST)

    ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या राजकीय स्टेटसवर निर्बंध, थेट शिस्तभंगाची कारवाई होणार

    ठाणे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर राजकीय पक्षांची संबंधित पोस्ट चिन्हे किंवा नेत्याचे छायाचित्र स्टेटस म्हणून ठेवण्यावर प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. संदर्भात मुख्यालयाचे उपयुक्त गजानन गोदेपुरे यांनी अध्यादेश काढून स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या आदेशानुसार अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईल व्हाट्सअप किंवा अन्य सोशल मीडियावर राजकीय पक्षाचे प्रचारात्मक, साहित्य ,बॅनर ,पोस्टर किंवा विशिष्ट नेत्यांचे फोटो स्टेटस म्हणून ठेवू नये. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोणतेही पूर्व सूचना न देता थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे आदेशाचे नमूद करण्यात आले आहे

  • 26 Mar 2026 10:08 AM (IST)

    भोंदू बाबा अशोक खरातला मोठा दणका, बँक खाते सील

    नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) आता आपला फास आवळला आहे. खरात याच्या शिवानिका संस्थेचे बँक खाते सील करण्यात आले असून, त्याच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. खरातने कमावलेली कोट्यवधींची आर्थिक माया आणि बेनामी मालमत्ता पोलिसांच्या रडारवर आहे. यामध्ये केवळ खरातच नव्हे, तर त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घरे आणि दुकानांचीही चौकशी केली जात आहे. नोंदणी विभागामार्फत राज्यभरातील त्याच्या मालमत्तांचा शोध घेतला जात असून, येत्या २-३ दिवसांत या तपासाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे. या मालमत्ता खरेदीसाठीचा पैसा नेमका कुठून आला, याचा उलगडा लवकरच होण्याची चिन्हे आहेत.

  • 26 Mar 2026 09:50 AM (IST)

    भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर

    वावी येथील पुरातन ऐतिहासिक वैजेश्वर मंदिर पाडण्याचा घातला होता घाट मंदिराची शक्ती संपल्याचा केला होता दावा, गावकऱ्यांना दिले होते मंदिर पाडण्याचा सल्ला. मात्र गावकऱ्यांनी दिला नकार, त्यांच्या गिरगाव येथील मंदिराकडे भावी वळवण्यासाठीवावी येथील वैजेश्वर मंदिर पाडण्याचा दिला होता सांगा

  • 26 Mar 2026 09:40 AM (IST)

    मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मोठा झटका!

    सॅप प्रणालीचा तांत्रिक लोचा; २५ हजार कर्मचाऱ्यांच्या एप्रिलच्या पगारात १० ते ५० हजारांची कपात! हजेरी-गैरहजेरीची नोंद भोवली; प्रशासकीय गोंधळामुळे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी रडकुंडीला. ​कामगार संघटना आक्रमक! बेकायदेशीर पगार कपातीविरोधात ‘म्युनिसिपल मजदूर युनियन’चा संपाचा गर्भित इशारा. ​प्रशासन आणि संघटना आमने-सामने; “आमची चूक नाही” म्हणत कर्मचाऱ्यांकडून तातडीने पगार देण्याची मागणी.

  • 26 Mar 2026 09:30 AM (IST)

    जलवाहिनीच्या गळतीवर मुंबई पालिकेचा 60 कोटी रुपयांचा आपत्कालीन खर्च..

    ​जलवाहिन्यांच्या गळतीवर पालिकेचा ६० कोटींचा आपत्कालीन खर्च; तरीही मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी संघर्ष! ६ वर्षांत ६० कोटी खर्च होऊनही गळती कायम; माहिती अधिकारातून प्रशासनाचा ‘पांढरा हत्ती’ उघड..धोक्याची घंटा! धरणांमध्ये केवळ ४१% पाणीसाठा शिल्लक; कडक उन्हाळ्यात पाणीकपातीचे सावट? ​३२% पाणी चोरी आणि गळती रोखण्यात प्रशासन अपयशी; दंड वसुली १६ कोटी, पण सुधारणा शून्य!

  • 26 Mar 2026 09:20 AM (IST)

    नाशिकमधील पेट्रोल पंपावर वर पहाटे पासून अचानक वाढली गर्दी

    लिमिटेड पेट्रोल डिझेल मिळणार या अफवेने नागरिकांची पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी. सुरळीत सुरू असलेल्या पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढल्याने पंप चालकांची तारांबळ. अनेक पंपांवर पेट्रोलच संपल्याने गोंधळाची परिस्थिती. नाशिक शहरातील सगळ्या पेट्रोल पंपांवर ग्राहकांची गर्दी

  • 26 Mar 2026 09:07 AM (IST)

    भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिस तपासाला नवे वळण

    बड्या आयुर्वेदिक औषधे व जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार. खरातने या दुकानातून हरिणाची कस्तुरी व जडीबुटी खरेदी केल्याचा संशय. नाशिकरोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर. संबंधित ज्वेलर्सकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती. अंधश्रद्धा व फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न

  • 26 Mar 2026 08:55 AM (IST)

    पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवेने राज्यभरात खळबळ

    पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवेने राज्यभरात खळबळ. पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा. ​ठाणे-कल्याण -डोंबिवलीत इंधनासाठी नागरिकांची झुंबड. अनेक पंपांवर परिस्थिती नियंत्रणाबाहेर, ‘नो स्टॉक’चे फलक. राज्यात गोंधळ पण मुंबईत शांतता. मलबार हिल, देसाई रोड परिसरात पंपांवर शुकशुकाट.

  • 26 Mar 2026 08:39 AM (IST)

    पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा.

    छत्रपती संभाजीनगर मध्ये बंद असलेल्या पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा.पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेनंतर लागल्या रांगा. शहरातील क्रांतीचौकात असलेल्या HP च्या पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी. दुचाकी व चारचाकी वाहनाच्या रांगा आल्या चक्क रस्त्यावर. रस्त्यावर वाहनाच्या रांगा आल्याने क्रांती चौकात वाहतुकीला अडथळा.

  • 26 Mar 2026 08:29 AM (IST)

    धुळे शहरातील पुरातन श्री राम मंदिरात भाविकांची गर्दी

    धुळे शहरात असलेल्या जुन्या मुंबई आग्रा मार्गावरील पुरातन श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी. गेल्या दोन दिवसापासून भजन कीर्तन नामजप कार्यक्रमाचं आयोजन. आज रामनवमी असल्याने सकाळपासूनच महिला-पुरुषांची गर्दी. दुपारी बारा वाजता होणार राम जन्म सोहळा.

  • 26 Mar 2026 08:23 AM (IST)

    अशोक खरातला बंदुकीचा परवाना कोणी दिला?

    भोंदू अशोक खरात प्रकरण.अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड. १५ ऑक्टोबर २०१२ रोजी शस्त्र परवाना मंजूर. १ जानेवारी २०२४ रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद.

  • 26 Mar 2026 08:22 AM (IST)

    शिर्डी मध्ये 115 वा रामनवमी उत्सव उत्साहात

    आज उत्सवाचा मुख्य दिवस. पारंपरिक पद्धतीने साई मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा तसेच धर्मध्वजाचं निशाण मिरवणूक पार पडणार. रामनवमी उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई. शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल. साई मंदिर आज रात्रभर दर्शनासाठी खुले. साईबाबा नामाच्या जयघोषाने दुमदूमली शिर्डी नगरी.

  • 26 Mar 2026 08:11 AM (IST)

    पंढरपूर शहर व परिसरात मध्य रात्री अवकाळी पावसाची हजेरी

    पंढरपूर शहर व परिसरात मध्य रात्री अवकाळी पावसाची हजेरी. सलग दोन ते तीन तास पावसाने लावली हजेरी. विजेच्या कडकडासह जोरदार अवकाळी पाऊस.मध्यरात्री बत्ती गुल झाल्याने उखाड्याने नागरिक हैराण. आज सकाळपासून पंढरपूर शहर व परिसरात ढगाळ वातावरण. हवामान खात्याने आज पावसाचा अंदाज वर्तवल्याने आज जर पाऊस झाला तर द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता.

  • 26 Mar 2026 08:09 AM (IST)

    भोंदू बाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा

    भोंदू बाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. नरबळी व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातंर्गत पोलिसांची कारवाई. 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत प्रचंड आर्थिक लूट केल्याचा आरोप. “21 देशांमध्ये घेऊन जा, तिथल्या मातीला स्पर्श करू दे तरच भरभराट होईल” अशी अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप.



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *