Headlines

IPL 2026 : मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक, CSK विरुद्ध दोनदा भिडणार, पलटण सहाव्यांदा चॅम्पियन होणार?

IPL 2026 : मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक, CSK विरुद्ध दोनदा भिडणार, पलटण सहाव्यांदा चॅम्पियन होणार?
IPL 2026 : मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक, CSK विरुद्ध दोनदा भिडणार, पलटण सहाव्यांदा चॅम्पियन होणार?


क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती तो क्षण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 19 व्या हंगामाचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या पर्वात साखळी फेरीत 28 मार्च ते 24 मे दरम्यान साखळी फेरीत एकूण 70 सामन्यांचा थरार रंगणार आहे. भारतातील एकूण 12 शहरांमध्ये या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. एकूण 10 संघांनी या मोसमासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक संघाला या मोसमात नेहमीप्रमाणे 14 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. या निमित्ताने आपण स्पर्धेतील सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स टीमच्या वेळापत्रकाबाबत जाणून घेऊयात.

मुंबईसमोर पहिल्याच सामन्यात केकेआरचं आव्हान

मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. तर दुसऱ्या सामन्यात रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पहिलाच सामना असणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं तर अजिंक्य रहाणे केकेआरचं नेतृत्व करणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. केकेआरचा कॅप्टन अजिंक्य मुंबईकर आहे. वानखेडे स्टेडियम अजिंक्यचं होम ग्राउंड आहे. त्यामुळे पलटणचा या सामन्यात घरच्या मैदानातील सामन्यात कस लागणार आहे.

पलटणचे सीएसके विरुद्ध 2 सामने

मुंबई या मोसमात घरच्या मैदानात 7 तर घराबाहेर 7 असे एकूण 14 सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्स महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 2 सामने खेळणार आहे. मुंबई आणि सीएसके आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील यशस्वी संघ आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांच्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं कायम लक्ष असतं.

पलटण सहाव्यांदा ट्रॉफी उंचावणार?

दरम्यान मुंबईने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईने 2020 साली शेवटची आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून पलटणची आयपीएल ट्रॉफीची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे यंदा मुंबई आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी पलटण : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिंझ, शेरफेन रदरफोर्ड, रायन रिकेल्टन, क्वींटन डी कॉक, दानिश मालेवार, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत, कॉर्बिन बॉश, विल जॅक्स, शार्दुल ठाकुर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडेय, दीपक चाहर, अश्विनी कुमार, रघु शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद इजहार आणि अल्लाह गजनफर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *