Headlines

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला धक्का, 253 सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीबाबत असं घडणार

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला धक्का, 253 सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीबाबत असं घडणार
IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला धक्का, 253 सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीबाबत असं घडणार


IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला धक्का, 253 सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीबाबत असं घडणारImage Credit source: IPL/BCCI

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझींना एका पाठोपाठ एक धक्के बसले आहेत. काही संघातील दिग्गज खेळाडू सुरूवातीच्या सामन्यात नसल्याने फ्रेंचायझींची धाकधूक वाढली आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनीबाबत चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मागच्या दोन तीन वर्षांपासून धोनी मैदानात उतरणार की नाही याबाबत प्रश्न विचारला जात होता. पण प्रत्येक वेळी धोनी मैदानात उतरला आणि चाहत्यांची मनं जिंकली. पण यावेळी चित्र काही वेगळं दिसत आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत खेळण्यासाठी महेंद्रसिंह धोनी सज्ज झाला आहे. पण एका बातमीने धोनीच्या चाहत्यांची धाकधूक वाढवली आहे. स्पर्धेच्या सुरूवातीला धोनीचा दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन आठवडे स्पर्धेबाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या 16 वर्षांच्या कारकि‍र्दीला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं.

महेंद्रसिंह धोनी 2 आठवडे मैदानात उतरणार नाही!

आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. हा सामना 30 मार्च रोजी होणार आहे. पण या सामन्यात महेंद्रसिंह धोनी खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्सने सांगितलं की, पोटरीच्या दुखापतीमुळे महेंद्रसिंह धोनी दोन आठवडे मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याची फलंदाजी पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. धोनीच्या दुखापतीची बातमी वाचून त्याचे चाहते निराश झाले आहेत. पण आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एक घडामोड मात्र पहिल्यांदाच घडली आहे. आयपीएल स्पर्धेच्या चेन्नई सुपर किंग्सच्या 16 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा संघ मैदानात उतरेल तेव्हा या संघातील प्लेइंग 11 मध्ये धोनी किंवा सुरेश रैना नसेल. यापूर्वी मागच्या 16 पर्वात असं कधीच घडलं नव्हतं. सुरेश रैना 2021 पर्यंत चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. तर धोनी एखाद दुसरा सामना खेळला नसेल. तेव्हा रैना कर्णधार असायचा. रैनाने निवृत्ती घेतल्यानंतर मागच्या 4 पर्वात धोनीने सीएसकेसाठी प्रत्येक समना खेळला. सीएसकेसाठी 16 पर्वात 253 सामने खेळले. प्रत्येक सामन्यात धोनी किंवा रैना असायचा. पण यावेळी या दोघंही नसतील. त्यामुळे या मालिकेला खंड पडणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *