Headlines

CSK चा शेअर 3 महिन्यात सुसाट, गुंतवणूकदारांना फायदाच फायदा, IPL मुळे लॉटरी लागणार?

CSK चा शेअर 3 महिन्यात सुसाट, गुंतवणूकदारांना फायदाच फायदा, IPL मुळे लॉटरी लागणार?
CSK चा शेअर 3 महिन्यात सुसाट, गुंतवणूकदारांना फायदाच फायदा, IPL मुळे लॉटरी लागणार?


IPL 2026 CSK Shares: आयपीएल 2026 ची धमाका आजपासून सुरू होत आहे. चेन्नई सुपर किंग्सचे स्टार सध्या जोरात आहे. असूचीबद्ध, अनलिस्टेड मार्केटमध्ये सीएएसकेच्या शेअरच्या किंमतीत मोठी दिसून आली आहे. अवघ्या 3 महिन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या शेअरचा भाव या बाजारात 60 टक्क्यांची वाढला. सीएसकेच्या शेअरमध्ये उसळी दिसण्यामागे कॅपिटल मार्केट IPL च्या फ्रँचाईजच्या व्यवसायाचे पूनर्मूल्यांकन करण्यात येत आहे. सीएसके सध्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी आणि व्यावसायिक दृष्ट्‍या दमदार संघ मानल्या जातो. आयपीएलच्या टीमचे मूल्यांकन नवीन उच्चांकावर पोहचले आहे. या आयपीएल सिझननंतर या मूल्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सच्या डीलने वाढवला भाव

इंक्रेड मनीच्या वृत्तानुसार, रॉयल चँलेजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सच्या कराराच्या घोषणेचा परिणाम सीएसकेच्या शेअरवर झाला आहे. या दोन्ही कराराने सीएसकेच्या शेअरचा भाव अनलिस्टेड मार्केटमध्ये वाढला आहे. हा करार होण्याची वार्ता येताच चेन्नई सुपर किंग्सच्या शेअरचा भाव 300 रुपये होता. हा करार होताच शेअरचा भाव 350 रुपयांवर पोहचला. एका महिन्यापूर्वी सीएसकेचा एक शेअर 250 रुपयांनी विक्री होत होता. तर तीन महिन्यांपूर्वी चेन्नईच्या शेअरचा भाव अनलिस्टेड मार्केटमध्ये अवघा 215 रुपयांवर होता.

का वाढत आहे सीएसकेच्या शेअरचा भाव

सीएसके सध्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी आणि व्यावसायिक दृष्ट्‍या दमदार संघ मानल्या जातो. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची 1.78 अब्ज डॉलर्सचा करार आणि राजस्थान रॉयलच्या 1.63 अब्ज डॉलर्सचा करारामुळे आयपीएलशी संबंधीत मालमत्तांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा फायदा सीएसकेला झाल्याचे दिसून आले आहे. नुवामा रिसर्चच्या अहवालानुसार, आरसीबीच्या 1.78 अब्ज डॉलर्सचा करारामुळे आयपीएलच्या टीमचे मूल्यांकन नवीन उच्चांकावर पोहचले आहे. हा करार गुजरात टायटन्सपेक्षा दोन पट अधिक मूल्यांचा आहे. 2008 पासून आतापर्यंत आयपीएल संघांचे मूल्यांकन 25 पटीने वाढले आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *