Headlines

‘विराट कोहली संपला..’ आरसीबीच्या विजयानंतर मोहम्मद कैफची पोस्ट व्हायरल, काय म्हणाला ते जाणून घ्या

‘विराट कोहली संपला..’ आरसीबीच्या विजयानंतर मोहम्मद कैफची पोस्ट व्हायरल, काय म्हणाला ते जाणून घ्या
‘विराट कोहली संपला..’ आरसीबीच्या विजयानंतर मोहम्मद कैफची पोस्ट व्हायरल, काय म्हणाला ते जाणून घ्या


‘विराट कोहली संपला..’ आरसीबीच्या विजयानंतर मोहम्मद कैफची पोस्ट व्हायरल, काय म्हणाला ते जाणून घ्याImage Credit source: Mohammad Kaif Twitter

आयपीएल 2026 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात 6 विकेट आणि 26 चेंडू राखून पराभवाची धूळ चारली. या सामन्यात सनराझर्स हैदराबादने 202 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने सावध पण 183.58 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने 38 चेंडूत नाबाद 69 धावा काढल्या. त्याच्या या फलंदाजीमुळे विराट कोहली या हंगामात हंगामा करणार असंच दिसत आहे. त्याने पहिल्याच सामन्यात त्याची झलक दाखवून दिली आहे. असं असताना सोशल मीडियावर मोहम्मद कैफची एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये त्याने लिहिलेल्या गोष्टींबाबत आता चर्चा होत आहे. नेमकं काय लिहिलं होतं ते जाणून घेऊयात.

मोहम्मद कैफने आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ‘विचार करा, ऑस्ट्रेलियात दोन सामन्यात सलग शून्यावर बाद झाल्यानंतर लोकं सांगत होतं की, विराट कोहली संपला. व्हाइट बॉल क्रिकेटमधील शेवटच्या 10 सामन्यात त्याचा स्कोअर असा आहे. 74, 135, 102, 65, 131, 77, 93 , 23, 124 आणि आयपीएलच्या या सामन्यात नाबाद 69 धावा’ मोहम्मद कैफने या पोस्टच्या माध्यमातून विराट कोहलीच्या वाढत्या वयावरून टीका करणाऱ्यांवर शरसंधान साधलं होतं. उलट विराट कोहलीत कसोटी आणि टी20 खेळण्याची क्षमता अजूनही असल्याचं त्याने सांगितलं.

विराट कोहली आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाा फलंदाजी आहे. आतापर्यंत त्याच्याशिवाय इतर कोणीही 8 हजार धावांचा पल्ला गाठू शकलेलं नाही. इतकंच काय तर पहिल्या सामन्यात नाबाद 69 धावांची खेळी करत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. पहिल्या सामन्यातील त्याची खेळी पाहून या पर्वात 9 हजार धावांचा पल्ला गाठेल असं क्रीडाप्रेमी म्हणत आहे. इतकंच काय सर्वाधिक षटकारांचा रोहित शर्माच्या विक्रमाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे विराट कोहली पुढच्या सामन्यात काय कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे. आरसीबीचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत 5 एप्रिलला होणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *