Headlines

Sanjay Raut | आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

Sanjay Raut | आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
Sanjay Raut | आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास


महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी गटांमध्ये असलेला संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, “आमचे खासदार अजिबात फुटणार नाहीत. आमच्याकडे 9 खासदार आहेत आणि पुढील निवडणूक होईपर्यंत ते 9 खासदार कायम राहतील. वारंवार फोडाफोडीच्या बातम्या पेरल्या जातात, ही राजकारणातील विकृती आहे.”

“महाराष्ट्रात देशात पारदर्शक राजकारण राहिलेले नाही. शिवसेनेचे खासदार फुटणार, फोडणार, ऑपरेशन टायगर किंवा इतर काही चालू आहेत असे सांगणे चुकीचे आहे. तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लागले आहेत, ते आधी बघा आणि ते भाजपकडूनच सुरू झाले आहेत. सत्ताधाऱ्यांनी यावर चिंतन करणे आवश्यक आहे., असा टोला संजय राऊत यांनी लगावला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *