Headlines

Ashok Kharat | अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं, 40- 45 नेते खरातच्या संपर्कात?

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 40 ते 45 नेते खरातच्या नियमित संपर्कात होते. विशेष म्हणजे खरातने राजकीय नेत्यांची नावे कोडवर्डमध्ये सेव्ह केली होती आणि कोणताही राजकीय निर्णय घेण्याआधी त्यांचा सल्ला घेतला जात होता. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, विधानपरिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा समावेश आहे. ही माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपास आणि चौकशीवर लक्ष ठेवले जात आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *