
भोंदू अशोक खरात प्रकरणावर संजय शिरसाट यांनी मत मांडलं असून त्यांनी SIT तपासाबाबत अनेक महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेच्या चौकशीबाबत तसेच इतर मुद्यांवरही स्पष्ट मत मांडले.
खरात प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, भोंदू खरात आता जेलमधून बाहेर पडणार नाही एवढं नक्की पण त्याला सपोर्ट करणाऱ्यांनाही कठोर शिक्षा व्हावी. शिंदेच्या चौकशीबाबत ते म्हणाले की, जर SIT ला वाटेल तर सगळ्यांचीच चैकशी व्हावी जे खरं आहे तेच समोर येईल. कोणत्याही भोंदू बाबाचं प्रकरण माहित नसताना त्याचे फॉलोवर्स असणं वेगळी बाब आहे. आपण तो राम रहिम पहिलाय. एका वेळी कित्येक जण त्याच्या सत्संगांत, मेळाव्यात यायचे. आज तो जेल मध्ये आहे मात्र त्याच्या सत्संगामध्ये येणारी लाखो लोकं नाही, कारण इतरांना त्याचा कारनामा तोपर्यंत माहितचं नव्हता. फक्त फोटो, किंवा कॉल यामुळे गुन्हा सिद्ध होत नाही. ज्याने गुन्हा केला तो तुरुंगात जाणारच, त्याला शिक्षा व्हावीच.’ असं शिरसाट म्हणाले.