Headlines

गेमिंग स्मार्टफोन खरेदी करताय तर नक्की लक्षात ठेवा ‘या’ 3 महत्त्वाच्या गोष्टी

गेमिंग स्मार्टफोन खरेदी करताय तर नक्की लक्षात ठेवा ‘या’ 3 महत्त्वाच्या गोष्टी
गेमिंग स्मार्टफोन खरेदी करताय तर नक्की लक्षात ठेवा ‘या’ 3 महत्त्वाच्या गोष्टी


सध्या भारतीय बाजारपेठेत प्रत्येक कंपनी त्यांचा नवीन आणि अनोखा स्मार्टफोन लाँच करत आहेत. तर त्यातील काही फोन हे फोटोग्राफी तर काही स्मार्टफोन हे सिक्योरिटी फीचर्ससाठी उत्तम आहेत. पण बाजारात असेही काही फोन आहेत जे गेमर्ससाठी बेस्ट आहेत. तुम्हाला जर गेमिंगची आवड असेल आणि तुम्ही नवीन गेमिंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. तर गेमिंग फोन खरेदी करताना सर्वप्रथम आकर्षक गोष्टींकडे न बघता फक्त फोनच्या प्रोसेसर आणि बॅटरी यांसारख्या खऱ्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष देणे गरजेच आहे. जर तुम्हाला जास्त पैसे खर्च न करता दर्जेदार गेमिंग स्मार्टफोन हवा असेल तर तुम्हाला या काही खास गोष्टीं लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

प्रोसेसर आणि जीपीयू आवश्यक आहेत

गेम खेळताना जवळपास सर्व काही प्रोसेसरवर अवलंबून असते. चांगला चिपसेट असलेला फोन खरेदी करा. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 वी जनरेशन सिरीज किंवा मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 सिरीज मोबाईल गेमिंगसाठी उत्तम असतात. यामुळे तुम्हाला अत्यंत सुरळीत गेमप्लेचा अनुभव मिळेल. याव्यतिरिक्त गेमिंग फोनमध्ये जीपीयू (GPU) देखील तितकाच महत्त्वाचा आहे, विशेषतः जर तुम्हाला बीजीएमआय (BGMI) किंवा कॉल ऑफ ड्यूटी मोबाईलसारखे गेम्स खेळायला आवडत असतील. एक पॉवरफूल जीपीयू म्हणजेच उच्च फ्रेम रेट्स आणि जीरो लॅग. जर गेमिंग ही तुमची आवड असेल तर एंट्री-लेव्हल प्रोसेसरचा विचारही करू नका.

डिस्प्लेची गुणवत्ता आणि रिफ्रेश रेट

योग्य डिस्प्ले गेमिंगचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतो. 120Hz रिफ्रेश रेटपेक्षा कमी असलेला डिस्प्ले घेऊ नका, कारण तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. सर्वोत्तम अनुभवासाठी AMOLED डिस्प्ले असलेला फोन निवडा. तुम्ही टच सॅम्पलिंग रेटकडेही लक्ष दिले पाहिजे. हा आकडा जितका जास्त असेल तितक्या वेगाने डिस्प्ले तुमच्या गेमिंग टचला प्रतिसादांना ओळखेल आणि तुमचा गेमिंग अनुभव अधिक चांगला होईल.

या फिचर्सकडेही लक्ष द्या

इंडिया टीव्हीनुसार मल्टीटास्किंगसाठी किमान 8 जीबी रॅम आवश्यक आहे, पण जर तुम्हाला 12 जीबी परवडत असेल तर ते अधिक चांगले. डेडिकेटेड गेम मोड आणि फिजिकल शोल्डर ट्रिगर्स यांसारखी अतिरिक्त फिचर्स केवळ दिखावा नाही तर ती गेमिंगला अधिक आनंददायक बनवतात. एकंदरीत गेमिंग फोन खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *