Headlines

IPL 2026 स्पर्धेत केकेआरची पराभवाची मालिका संपणार! 18 कोटींचा खर्च उपयोगी पडणार

IPL 2026 स्पर्धेत केकेआरची पराभवाची मालिका संपणार! 18 कोटींचा खर्च उपयोगी पडणार
IPL 2026 स्पर्धेत केकेआरची पराभवाची मालिका संपणार! 18 कोटींचा खर्च उपयोगी पडणार


IPL 2026 स्पर्धेत केकेआरची पराभवाची मालिका संपणार! 18 कोटींचा खर्च उपयोगी पडणार
Image Credit source: IPL/BCCI

आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स सर्वात वाईट कामगिरी केली आहे. त्यामुळे गुणतालिकेत तळाशी आहे. आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी 3 सामन्यात पराभव झाला आहे. तर पंजाब किंग्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने फुकटचा 1 गुण मिळाला आहे. गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स संघ तळाशी आहे. त्यामुळे आता उर्वरित 10 पैकी 7 सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. प्रत्येक सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. या सामन्यापूर्वी केकेआरसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण 18 कोटींचा खेळाडू संघासोबत रूजू होणार आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराणा केकेआर संघाकडून खेळणार आठहे. कारण श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे.

आयपीएल स्पर्धेत केकेआरची मागच्या सामन्यात गोलंदाजीची बाजू कमकुवत दिसली होती. मात्र पथिराणाच्या एन्ट्रीमुळे आता ही बाजू भक्कम होणार आहे. मागच्या पर्वातील चुकांमधून धडा घेत केकेआरने आयपीएल मिनी लिलावात मथिशा पथिराणासाठी 18 कोटी मोजले होते. पण दुखापतग्रस्त असल्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिलं नव्हतं. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेदरम्यान त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फक्त 4 चेंडू टाकल्यानंतर स्पर्धेतून आऊट झाला होता. पण त्याने फिटनेस टेस्ट पास केली आणि त्याला एनओसी मिळाली आहे. मथिशा पथिराणा 14 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याचं बोललं जात आहे.

केकेआरचं गोलंदाजी युनिट स्पर्धेपूर्वीच कमकुवत झालं होतं. मुस्तफिझुर रहमानला काढावं लागलं. तर दुखापतीमुळे आकाश दीप आणि हार्षित राणा स्पर्धेला मुकले. तर कॅमरून ग्रीनला पहिल्या काही सामन्यात गोलंदाजी करण्यास मनाई होती. तर मथिशा पथिराणाही दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्यामुळे गोलंदाजीत सर्वच विस्कळीत झालं होतं. आता मथिशाच्या एन्ट्रीमुळे केकेआरला काही अंशी दिलासा मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या चार पर्वात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. त्यात त्याने 32 सामन्यात 47 विकेट घेतल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *