Headlines

अखेर पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा पडला, सौदी अरेबियाचं सिक्रेट समोर येताच खळबळ, एकीकडे शांततेसाठी चर्चा तर दुसरीकडे…

अखेर पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा पडला, सौदी अरेबियाचं सिक्रेट समोर येताच खळबळ, एकीकडे शांततेसाठी चर्चा तर दुसरीकडे…
अखेर पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा पडला, सौदी अरेबियाचं सिक्रेट समोर येताच खळबळ, एकीकडे शांततेसाठी चर्चा तर दुसरीकडे…


Pakistan Saudi Arabia Help : अमेरिका आणि इराण यांच्यात नुकतेच पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्यानंतर ही पहिलीच बैठक होती. या बैठकीतून युद्ध कायमस्वरुपी थांबवण्यासाठी काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. परंतु ही चर्चा निष्फळ ठरली. या दोन्ही देशांना चर्चेसाठी एकत्र आणण्यात पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही देशांतील वाद मिटावा, युद्ध संपून जगात शांतता नांदावी असा हेतू ठेवून पाकिस्तान ही भूमिका पार पाडत आहे, असे सांगितले जात होते. परंतु आता इराणचे युद्ध थांबवण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झाला आहे. एका बाजूने या देशाने इराण-अमेरिका यांच्यात बैठक घडवून आणली असली तरीही हा देश दुसरीकडे सैदी अरेबियाला शस्त्र पुरवत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या हेतूंविषयी शंका घेतली जात आहे.

पाकिस्तानने नेमकं काय केलं?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून सौदी अरेबियाला शस्त्रं पुरवली जात आहेत. अमेरिकेसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने सौदी अरेबियातील अमेरिकन लष्करी तळांवर मोठे हल्ले केले होते. या हल्ल्यांमुळे सौदी अरेबियाचे बरेच नुकसान झाले. विशेष म्हणजे
इराणने हे हल्ले थांबवावेत म्हणून सौदी अरेबियानेदेखील इराणच्या या कृत्याचा वेळोवेळी निषेध केला. याच इराणला पाकिस्तान शस्त्र पुरवत असल्याचे समोर आले आहे.

संरक्षण कराराअंतर्गत पाकिस्तानने केली मदत

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने सैदी अरेबियाला F-16 फायटर जेट दिले आहेत. काही महिन्यांपूरर्वी सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी पातळीवर सहकार्य करण्यासाठी एक करार झाला होता. या कराराअंतर्गत एका देशावरील हल्ला हा दुसऱ्या देशावरील हल्ला समजला जाईल, अशी तरतूद आहे. सोबतच या दोन्ही देशांत संरक्षण पातळीवरही करार झाला होता. याच संयुक्त सामरिक संरक्षण कराराअंतर्गत पाकिस्तानने सौदी अरेबियाला ही मदत केल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानच्या हेतूंविषयी उपस्थित केली जातेय शंका

त्यामुळेच आता पाकिस्तान एकीकडे इराणचे युद्ध संपण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत असले तरीही दुसरीकडे हाच देश इराणचा विरोध करणाऱ्या सौदी अरेबियाला फायटर जेट पुरवत आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या हेतूंविषयी शंका उपस्थित केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *