Headlines

युद्धाच्या काळात इस्रायलला जबर हादरा, भारताच्या मित्राने ऐनवेळी दिला धोका, डील रद्द

युद्धाच्या काळात इस्रायलला जबर हादरा, भारताच्या मित्राने ऐनवेळी दिला धोका, डील रद्द
युद्धाच्या काळात इस्रायलला जबर हादरा, भारताच्या मित्राने ऐनवेळी दिला धोका, डील रद्द


अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर भीषण हल्ले केले होते, मात्र सध्या युद्धविरामाची घोषणा झालेली आहे. या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने इराणला नमवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला, मात्र त्यांचा अद्याप विजय होऊ शकलेला नाही. अशातच आता या युद्धाच्या काळात इस्रायलला मोठा धक्का दिला आहे. इटलीने इस्रायलसोबतचा महत्त्वाचा संरक्षण करार स्थगित केला आहे. या करारात लष्करी उपकरणांची देवाणघेवाण आणि संरक्षण तंत्रज्ञान संशोधनाचा समावेश होता. आता हा करार रद्द झाल्याने इटलीकडून इस्रायलला शस्त्रे मिळणार नाहीत, हा नेत्यान्याहू यांना मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची घोषणा

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मंगळवारी व्हेरोना येथे एका कार्यक्रमात इस्रायलसोबतचा करार मोडला असल्याची घोषणा केली आहे. इटलीच्या एएनएसए आणि एजीआय या वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मेलोनी यांनी सांगितले की सध्याची परिस्थिती लक्षात घेता सरकारने इस्रायलसोबतच्या संरक्षण कराराचे नूतनीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

करार स्थगित

या सूत्रांच्या मते, हा करार 2006 साली इस्रायलच्या मंजुरीनंतर झाला होता, मात्र आता हा करार सुरू ठेवणे राजकीयदृष्ट्या कठीण झाले आहे. या कराराचा दर पाच वर्षांनी त्याचा आढावा घेतला जात होता. यात संरक्षण उद्योग, लष्करी कर्मचाऱ्यांचे शिक्षण-प्रशिक्षण, संशोधन व विकास आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांतील सहकार्याचा समावेश होता, मात्र आता हा करार पुढे सुरू न ठेवण्याचा निर्णय इटलीने घेतला आहे.

इस्रायलची अडचण वाढण्याची शक्यता

दरम्यान, गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढला होता. इटलीने इस्रायली सैन्यावर लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेतील इटालियन ताफ्यावर इशाऱ्यादाखल गोळीबार केल्याचा आरोप केला होता. यात एक वाहनाचे नुकसान झाले होते. याच कारणामुळे हा करार आता पुढे सुरू राहणार नाही. त्यामुळे ऐन युद्धाच्या काळात इस्रायलची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कारण इराणविरुद्धचे युद्ध अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे पुन्हा युद्ध सुरू झाल्यास इस्रायलला शस्त्रांची कमतरता भासू शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *