Headlines

Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर… आरोपींमध्ये वाद अन् परतवाडातील अत्याचार प्रकरण उघडकीस

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज, तनवीर या मुख्य आरोपींना अटक केली असून, या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अयाज, तनवीर आणि त्याचा मित्र उझैर यांच्यात पैज लागली होती. कोण किती हिंदू मुली पटवतो. दोघांनी अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करून अश्लील व्हिडिओ बनवायचे. आतापर्यंत त्यांनी शेकडो अश्लील व्हिडिओ व्हायरल केले, दरम्यान त्यांच्यात पैशांवरून वाद झाला. हा वाद पेटला आणि अखेर अमरावतीतील प्रकरण उघडकीस आलं, असं सांगितलं जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत किमान सात तरुणींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ पुरावे हाती लागले आहेत. मात्र, प्राथमिक तपासात हा आकडा अधिक मोठा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून 180 पेक्षा अधिक तरुणींचे शोषण केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणातील पीडित तरुणी परतवाडा, अमरावती आणि नागपूर परिसरातील असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपी तनवीर हा MIM पक्षाशी संबंधित कार्यकर्ता असल्याची माहितीही पुढे आली आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *