Headlines

Maharashtra News LIVE : पलाश मुच्छल विरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ

Maharashtra News LIVE : पलाश मुच्छल विरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ
Maharashtra News LIVE : पलाश मुच्छल विरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ


  • 20 Apr 2026 02:45 PM (IST)

    नवी मुंबईत बस चालकाला RTO अधिकाऱ्याची मारहाण

    नवी मुंबईत बस चालकाला RTO अधिकाऱ्याची मारहाण… पोलीस अधिकाऱ्याकडून बस चालकाला मारहाण… चालकाला झालेली मारहाण कॅमेऱ्यात कैद… घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

  • 20 Apr 2026 02:30 PM (IST)

    नाशिकच्या सटाणा बाजार समितीबाहेर शेतकऱ्यांचा रास्ता रोको

    नाशिकच्या सटाणा बाजार समितीबाहेर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. बाजार समितीमध्ये व्यपारी- संचालकांचा वाद उफाळला. ट्रॅक्टरसह सटाणा- मालेगाव रोडवर आंदोलन. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प, वाहनांच्य लांब रांगा. कांदा लिलाव तात्काळ सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. लिलाव बंद ठेवल्याने शेतकरी संतप्त.

  • 20 Apr 2026 02:15 PM (IST)

    संभाजीनगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत व्हायरल व्हिडीओवरून वाद

    संभाजीनगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत व्हायरल व्हिडीओवरून वाद. विरोधी पक्षनेते समीर साजेद यांच्या व्हायरल व्हिडीओवरून वाद. MIMचे नगरसेवक समीर साजेद यांनी माफी मागण्याची मागणी. कोण महापौर, कोण आमदार, कोण खासदार, जुन्या शहरात इम्तियाज जलील शिवाय काही काम होत नाही असं वक्तव्य केलेला समीर साजेद यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता…

  • 20 Apr 2026 01:55 PM (IST)

    नाशिकमधील निदा खानचे वकील न्यायालयात दाखल

    नाशिकमधील TCS कंपनीतील महिला लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. निदा खानचे वकील राहुल कासलीवाल न्यायालयात दाखल झाले आहेत. निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर कोर्ट काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 20 Apr 2026 01:45 PM (IST)

    पलाश मुच्छल विरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ

    पलाश मुच्छल विरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा विज्ञान मानेने दिला आहे.

  • 20 Apr 2026 01:30 PM (IST)

    सिलेंडर गळतीमुळे पत्नी-पत्नी जखमी, रुग्णालयात दाखल

    बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे भारत जयराम माने हे दोघे पती-पत्नी घरामध्ये असतानाच रेग्युलेटर बसवताना वॉल पिन लीक झाली. त्यामुळे गॅस गळती झाली आणि बाजूला देव्हाऱ्यात लावलेला दिव्याने पेट घेतला. त्यामुळे भारत माने यांचा चेहरा व हातापायाला इजा झाली आहे. पती-पत्नींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • 20 Apr 2026 01:15 PM (IST)

    बीड तालुक्यातील उन्हाळी बाजरी पीकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान

    बीड तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने उन्हाळी बाजरी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने बाजरी जमीनदोस्त झाली आहे तर गाराचा मारा बसल्याने आणि पावसाच्या पाण्याने पिकावर बुरशी चढली आहे. या नुकसानामुळे बळीराजा संकटात आला आहे.

  • 20 Apr 2026 12:59 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 650 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 62 हजार 650 रुपयांवर पोहोचल आहेत.

  • 20 Apr 2026 12:53 PM (IST)

    डोंबिवलीत अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर घसरलेली लोकल हटवली; तरीही मध्य रेल्वे विस्कळीतच

    डोंबिवलीत अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर घसरलेली लोकल हटवली, तरीही मध्य रेल्वे विस्कळीतच आहे. पहाटे ८:०९ वाजता कळवा कारशेडहून येणाऱ्या रिकाम्या लोकलचा डबा रुळावरून घसरला होता. अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर रेल्वे प्रशासनाला डबा बाजूला काढण्यात यश आलं. घसरलेली ट्रेन ट्रॅकवर आणून कारशेडच्या दिशेने रवाना करण्यात आली. मात्र मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्णपणे सुरळीत नाही. डोंबिवली प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरील लोकल सेवा बंद आहे. तर धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवल्या आहेत. कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर काही गाड्या न थांबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 20 Apr 2026 12:40 PM (IST)

    विधेयक पडणार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहीत होतं- सुप्रिया सुळे

    विषय नसताना विषय बनवत आहेत. विधेयक पडणार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहीत होतं. आम्हाला भाजपच्या दुटप्पीपणाची सवय झाली आहे. 50 टक्के जागा प्रत्येक राज्यात वाढवणार, हे विधेयकात का नाही, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

  • 20 Apr 2026 12:27 PM (IST)

    अडीच वर्ष झालं तरी विधेयकाची अंमलबजावणी का झाली नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल

    2023 मध्ये नारीशक्ती विधेयक पास झालं होतं. 2024 च्या लोकसभेत आरक्षण लागू होण्याची शक्यता होती. मग अडीच वर्ष झालं तरी विधेयकाची अंमलबजावणी का झाली नाही? आता विशेष अधिवेशन बोलावलं, यातून तुम्हाला काय मिळालं, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

  • 20 Apr 2026 12:17 PM (IST)

    अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एकाच दिवसात सोन्या चांदीच्या खरेदीमुळे तब्बल 65 ते 70 कोटींची उलाढाल

    जळगावच्या सराफ बाजारात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एकाच दिवसात सोन्या चांदीच्या खरेदीमुळे तब्बल 65 ते 70 कोटींची उलाढाल झाली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांचा सोन्या-चांदीच्या खरेदीकडे कल असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात वाढ झाली असताना देखील सोन्या चांदीच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सोन्या चांदीची खरेदी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात 57 हजार तर चांदीच्या दरात 1 लाख 63 हजार रुपयांची वाढ झाली होती.

  • 20 Apr 2026 12:04 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वीकृत दहा नगरसेवक पदाची निवड जाहीर

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वीकृत दहा नगरसेवक पदाची निवड जाहीर करण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपकडून पाच जणांची निवड करण्यात आली. तर माजी मंत्री भागवत कराड यांचे चिरंजीव हर्षवर्धन कराड यांची नगरसेवक पदी वर्णी लागली आहे. छायाताई खाजेकर, गोकुळ मलके, विजयसींग झाला आणि अमृताताई पालोदकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आली. MIM कडून गौतम खरात, शेख अहमद शेख इलियाज, मोहम्मद आसरार मोहम्मद अकबर यांची तर शिंदे शिवसेनेच्या वतीने स्वीकृत नगरसेवक पदी शुभम काळे यांची नियुक्ती करण्यात आली. तर ठाकरे शिवसेनेच्या वतीने प्रदीप शिंदे यांची नियुक्ती झाली.

  • 20 Apr 2026 11:53 AM (IST)

    धुळे महानगरपालिकेच्या स्थायी सभापती पदाची आज निवडणूक

    धुळे महानगरपालिकेच्या स्थायी सभापती पदाची आज निवडणूक.  भाजपाच्या वतीने लताबाई सोनार यांचा एकमेव अर्ज आला.  पिठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत सभापती निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. स्थायी समितीच्या सभेला भाजपाचे अवघे सातच सदस्य उपस्थित होते.  लताबाई सोनार यांची बिनविरोध निवड झाली.

  • 20 Apr 2026 11:39 AM (IST)

    गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड कनेक्शन समोर

    गोरेगाव ड्रग्ज प्रकरण – नेस्को सेंटरमध्ये आयोजित पार्टीत बॉलिवूड कनेक्शन समोर आलं आहे.   सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील दोन जण उपस्थित होते, ज्याचा तपास पोलीस करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये दोन जणांना पाहिलं आहे, पण या प्रकरणात त्यांचा काही सहभाग आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  तपासादरम्यान या दोघांची भूमिका उघडकीस आल्यास, पोलीस त्यांच्यावरही कारवाई करू शकतात.

  • 20 Apr 2026 11:31 AM (IST)

    गोरेगाव मोतीलाल नगर येथे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

    मुंबईतील गोरेगाव मोतीलाल नगर येथे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन सुरू आहे.  संजीव जयस्वाल यांनी धमकी दिल्याचा आरोप लोकांनी  केला आहे. स्थानिकांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली.

  • 20 Apr 2026 11:25 AM (IST)

    विरोधकांनी नारीशक्तीचा मोठा अपमान केला – देवेंद्र फडणवीस

    विरोधकांनी नारीशक्तीचा मोठा अपमान केला. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या  विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं. विरोधकांनी सरड्यासारखे रंग बदलले.  लोकशाहीत महिला सहभागाची हत्या झाली, विरोधक त्याचे हत्यारे – देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

  • 20 Apr 2026 11:15 AM (IST)

    70 कोटी महिलांचा विश्वासघात करत विरोधकांनी या विधेयकाची भ्रूणहत्या केली – देवेंद्र फडणवीस

    महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद सुरू.  काँग्रेस, डीएमके, तृणमूल, उबाठा गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, समाजवादी पक्ष, अशा सर्व पक्षांनी आपल्या महिलाविरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकला आवश्यक ती दोन तृतीयांश मतं मिळू दिली नाहीत. 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीने करण्यात आली – देवेंद्र फडणवीस यांची टीका

  • 20 Apr 2026 11:02 AM (IST)

    पुणे – राजगुरुनगर येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात चोरट्यांचा दानपेटीवर डल्ला

    पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे.  रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दोन दानपेट्या फोडल्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.

  • 20 Apr 2026 10:52 AM (IST)

    राळेगावमधील बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद; राळेगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

    यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथून एक मुलगी बेपत्ता झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, या प्रकरणाच्या निषेधार्थ आज ‘राळेगाव बंद’ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून या निषेधाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, शहरातील क्रांती चौकातून एक भव्य मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके स्वतः सहभागी झाले होते. बेपत्ता मुलीचा शोध लवकरात लवकर लावावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली असून या घटनेमुळे राळेगाव परिसरात तणावाचे आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

  • 20 Apr 2026 10:47 AM (IST)

    पुढील ४८ तास महत्त्वाचे; सांगली, सातारा, कोल्हापूरसह कोकणात मुसळधार पाऊस

    महाराष्ट्रात पुढील दोन दिवस हवामानात मोठा बदल होणार असून, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या हवामान प्रणालीचा हा परिणाम असून, नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • 20 Apr 2026 10:37 AM (IST)

    प्राजक्त तनपुरेंच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष; राहुरी पोटनिवडणुकीत कोणाला देणार साथ?

    अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे नेमकी काय भूमिका घेणार आणि कोणाला पाठिंबा जाहीर करणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. विशेष म्हणजे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात येत असून, या दौऱ्यादरम्यान प्राजक्त तनपुरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? या शक्यतेने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निवडक कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर तनपुरे आपली अंतिम भूमिका स्पष्ट करणार असल्याने राहुरीच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 20 Apr 2026 10:27 AM (IST)

    पुण्यात चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला; पालकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

    पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरूच असून राजगुरुनगर शहरात एका चिमुकल्या मुलीवर कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. सुदैवाने, मुलीच्या पालकांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आणि तिचे प्राण वाचले; ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

  • 20 Apr 2026 10:17 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांनी खोट्या प्रचाराबद्दल देशाची माफी मागावी – संजय राऊत

    ज्या विधेयकाचे स्वागत फडणवीसांनी दीड वर्षांपूर्वीच केले होते, त्यावरून आता पुन्हा राजकारण करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या चुकीच्या विधानांबद्दल आणि खोट्या प्रचाराबद्दल देशाची माफी मागावी, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

  • 20 Apr 2026 10:07 AM (IST)

    पुन्हा महिला आरक्षणाचे डमरू वाजवून कोणाला फसवताय? संजय राऊतांचा सवाल

    संवैधानिक पदावर बसलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्याची शपथ घेतलेली असते. त्यांनी जनतेची फसवणूक करू नये. २०२३ मध्येच संसदेने नारी शक्ती अधिनियम मंजूर केला आणि १६ एप्रिल रोजी केंद्र सरकारने त्याची अधिसूचनाही काढली. मग आता पुन्हा महिला आरक्षणाचे डमरू वाजवून कोणाला फसवताय?

  • 20 Apr 2026 09:50 AM (IST)

    गडचिरोली आलापल्ली वनपरिक्षेत्रात वन विभागाची धडक कारवाई

    वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या 12 जणांना वन विभागाने केली अटक. रात्री वन विभागाची ग्रस्त सुरू असताना काही संशयित लोक जंगलात आढळले, यांची कसून चौकशी केल्यानंतर वन्य प्राण्यांचे शिकार करणारे साहित्य या टोळीकडे आढळले. या टोळीकडून विविध वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले. मोठी कारवाई वन विभागाने यावेळी आलापल्ली भागात केली_ मोठी टोळीला वन विभागाने ताब्यात घेतले

  • 20 Apr 2026 09:40 AM (IST)

    आज राळेगांव सकल हिंदुत्ववादी संघटनेकडून बंदची हाक

    मुली बेपत्ता – मानव तस्करी करणाऱ्या संशयित सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी यवतमाळच्या राळेगांव शहर कडकडीत बंदची हाक. शहरातील क्रांती चौकात केले जाणार आंदोलन. शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

  • 20 Apr 2026 09:30 AM (IST)

    वादळी वारा आणि गारपिटीचा तब्बल पाच लाख शेतकऱ्यांना फटका

    गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यात ३ हजार ७७८ गावांमधील तब्बल २ लाख हेक्टरवरच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान. अवकाळीचा १ लाख २७ हजार ७२७ हेक्टरवरील फळबागा आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आतापर्यंत ३६४ कोटी ७३ लाख रुपयांची भरपाई वितरीत. मार्च महिन्यातील नुकसानीमुळे बाधित १९ हजार ५०७ शेतकऱ्यांना अद्याप मदतीची प्रतीक्षा आहे.

  • 20 Apr 2026 09:20 AM (IST)

    डोंबिवलीजवळ रिकाम्या लोकलचा डबा रुळावरून घसरला

    कलवा कारशेडहून कल्याणकडे येणाऱ्या रिकाम्या लोकल रेकचा एक डबा रुळावरून घसरला. सकाळी ८:०९ वाजता घटना घडली असून सुदैवाने लोकल रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अप दिशेतील ३ लोकल गाड्या खोळंबल्या असून रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू

  • 20 Apr 2026 09:05 AM (IST)

    पंकजा मुंडे, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील अक्षय कर्डिलेसाठी प्रचाराच्या मैदानात

    राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरिता अक्षय कर्डिले याला भाजपाने उमेदवारी दिली. आज मोठी सभा होणार आहे. राज्यातील अनेक मंत्री राहुरीत पोहचणार आहेत. कर्डिले आणि मुंडे घराण्यांचे संबंध फार जुने चांगले आहेत. यातच पंकजा मुंडेही अक्षय कर्डिलेच्या प्रचारासाठी मैदानात आहेत.

  • 20 Apr 2026 08:56 AM (IST)

    अविनाश भोसले यांना दिलासा

    ‘येस बँक’ आणि ‘दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड’च्या (डीएचएफएल) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 20 Apr 2026 08:52 AM (IST)

    राळेगांव सकल हिंदुत्ववादी संघटनेकडून बंदची हाक

    यवतमाळ आज राळेगांव सकल हिंदुत्ववादी संघटनेकडून बंदची हाक. मुली बेपत्ता, मानव तस्करी करणाऱ्या संशयित सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी यवतमाळच्या राळेगांव शहर कडकडीत बंदची हाक. शहरातील क्रांती चौकात केले जाणार आंदोलन. शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात.

  • 20 Apr 2026 08:35 AM (IST)

    अक्षय कर्डिलेंसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

    राहुरी पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिलेंसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा. सभेला महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषद सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती. आजी-माजी आमदार, खासदार उपस्थित राहणार. दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष.

  • 20 Apr 2026 08:34 AM (IST)

    अल्पवयीन विद्यार्थिनीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचा तगादा

    जळगावात अल्पवयीन विद्यार्थिनीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचा तगादा लावल्याचा प्रकार समोर. तरुणाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताने पीडितेच्या घराच्या खिडकीवर दगडफेक करून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद. संशयित रोहन पाटीलवर पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये पोलिसात गुन्हा दाखल केला.

  • 20 Apr 2026 08:18 AM (IST)

    निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणीची शक्यता

    नाशिक TCS प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणीची शक्यता. नाशिक न्यायालयात सुनावणीची शक्यता. गेल्या काही दिवसांपासून निदा खान आहे फरार. TCS प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयित आरोपींना मदत केल्याचा निदा खानवर आरोप.

  • 20 Apr 2026 08:16 AM (IST)

    पावसाबद्दल भेंडवळाची भविष्यवाणी काय?

    अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाते घटमांडणी. 350 वर्षांची परंपरा आजही कायम. भेंडवळ येथील वाघ महाराज करतात भाकित. पाऊस, पिक परिस्थिती, राजकारण या बद्दल वर्तवलं जातं भाकीत. पाहिला महिना पाऊस कमी आहे. दुसरा महिना पाऊस साधारण असणार. तिसरा महिना चांगला आहे, अतिवृष्टी होण्याची शक्यता. चौथा महिना पाऊस आहे. पिकांची नासाडी होणार. अवकाळी पाऊस भरपूर आहे. राजा कायम आहे, म्हणजेच पंतप्रधान पद कायम राहणार.



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *