Headlines

भारतात रशिया युद्धनाैका तैनात करणार, तब्बल 3000 सैनिकही, थेट रशिया आणि भारताने..

भारतात रशिया युद्धनाैका तैनात करणार, तब्बल 3000 सैनिकही, थेट रशिया आणि भारताने..
भारतात रशिया युद्धनाैका तैनात करणार, तब्बल 3000 सैनिकही, थेट रशिया आणि भारताने..


भारत आणि रशियाची खास मैत्री आहे. कित्येक वर्षांपासूनही मैत्री आहे. अमेरिका इराण युद्धात जग तणावात आहे. अशावेळी भारताच्या मदतीला रशिया धावून आला. भारताच्या शेजारी देशात एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. पण भारताला हवे तेवढे कच्चे तेल रशिया पुरवत आहे. होर्मुज खाडी सध्याच्या घडीला ठप्प आहे. मात्र, आपल्या शक्तीवर रशिया भारतापर्यंत कच्चे तेल पोहोचवत आहे. भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री अनेकांच्या डोळ्यावर येते. यादरम्यानच आता भारत आणि रशियाने नवीन सैन्य करार केला. या कराराच्या माध्यमातून दोन्ही देश एक दुसऱ्याच्या जमिनीवर सैनिक, युद्धनाैका आणि सैन्य विमान तैनात करू शकतात. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, या कराराच्या माध्यमातून भारत आणि रशिया 3000 सैनिक, 5 युद्धनाैका आणि 10 लढाऊ विमाने तैनात करू शकतात.

हा एक अत्यंत मोठा करार मानला जात आहे. यातून आता भारत आणि रशियाचे संबंध नक्की कसे आहेत, हे पुढे येत आहेत. दोन्ही देश एकमेकांना लष्करी ताकद देत आहेत. 12 जानेवारीपासून हा करार लागू झाल्याची माहिती मिळत आहे. रशियाने या कराराला मंजूरी देणारा कायदा डिसेंबर 2025 मध्ये लागू केला. हा करार 5 वर्षांसाठी करण्यात आला. जर योग्य वाटले तर दोन्ही देश निर्णय घेऊन त्याला पुन्हा वाढू शकतात.

नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, दोन्ही देश एकमेकांचे सैन्य ठिकाणे, एअरबेस आणि बंदर वापरू शकतात. भारताच्या सैन्य ठिकाणांचा वापर करण्यास रशियाला परवानगी आहे. भारत देखील रशियाचे एअरबेस वापरू शकतो. यासोबतच या करारात अनेक गोष्टी देखील आहेत. दोन्ही देश युद्धभ्यासही करू शकतात. लॉजिस्टिक मदतही करारात आहे. यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

भारत आणि रशिया यांची लष्कर ताकद वाढणार हे स्पष्ट आहे. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली होती. मात्र, त्यानंतर आता रशियाच्या तेलावरील निर्बंध काही दिवसांकरिता अमेरिकेने उठवली आहेत. भारत सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने काही महिन्यांपूर्वी भारतावर रशियाचा मोठा दबाव होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *